घरट्रेंडिंगआक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी 'फेसबुक'चे ७५०० कंटेट समीक्षक

आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी ‘फेसबुक’चे ७५०० कंटेट समीक्षक

Subscribe

फेसबुकमार्फत आक्षेपार्ह पोस्ट पसरू नयेत यासाठी सदर आक्षेपार्ह मजकूरांवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकनं ७५०० कंटेट समीक्षकांची नेमणूक केली आहे.

सध्या सोशल मीडिया हे महत्त्वाचं माध्यम असलं तरीह सर्वात जास्ती अफवादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच फोफावतात. एखाद्या विशिष्ट समूहाच्या भावनांना भडकवण्यासाठी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जातो. तसंच एखाद्याची बदनामी करण्यासाठीदेखील सोशल मीडियाचा उपयोग करण्यात येतो. या सर्वावर रोख लावण्यासाठी आता फेसबुकनं महत्त्वपूर्ण पाऊल उचचलं आहे. फेसबुकमार्फत अशा पोस्ट पसरू नयेत यासाठी सदर आक्षेपार्ह मजकूरांवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकनं ७५०० कंटेट समीक्षकांची नेमणूक केली आहे.

५० भाषांमध्ये करणार काम

फेसबुकनं नेमलेले हे कंटेट समीक्षक २४ तास अशा आक्षेपार्ह मजकूरांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. जगभरातील साधारण ५० भाषांपेक्षा अधिक ज्ञान असणाऱ्या ७५०० हजार माहिती निरीक्षकांची नियुक्ती फेसबुककडून करण्यात आली आहे. फेसबुकवर काय मजकूर येतो त्यावर लक्ष ठेवून आक्षेपार्ह मजकूर आल्यास, तो मजकूर हटवणं हे या कंटेट समीक्षकांचं काम असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट अथवा कोणतेही द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट असल्यास, त्यावर या समीक्षकांना लक्ष ठेवायचे आहे.

- Advertisement -

फेसबुकची नवी मोहीम

फेसबुकच्या या नव्या मोहिमेबद्दल फेसबुकचे परिचालन उपाध्यक्ष अॅलेन सिल्व्हरनं ब्लॉगद्वारे माहिती दिली आहे. ‘यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर समीक्षा करण्यात आलेली नाही. वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या देशातील लोक एकमेकांशी जोडले जातील असं व्यासपीठ यापूर्वी नव्हतं. त्यामुळं या जबाबदारी आणि आव्हानांची आम्हाला पूर्णतः कल्पना आहे. एखादा आक्षेपार्ह मजकूर स्थानिक भाषेत असेल तर त्याचा अर्थ जाणून ते हटवण्याची जबाबदारी काही खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे,’ असं अॅलन यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -