घरटेक-वेकफेसबुक कर्मचाऱ्यांनो खबरदार आयफोन वापराल तर!

फेसबुक कर्मचाऱ्यांनो खबरदार आयफोन वापराल तर!

Subscribe

मार्क जुकरबर्ग यांनी फेसबुक कर्मचाऱ्यांना आयफोन सोडून अँड्रॉइड वापरण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाचे कारण काय?

फेसबुकचे बहुतांश कर्मचारी आता आयफोन सोडून अँड्रॉइडचा वापर करीत आहेत. आयफोनमध्ये काही वावगं आहे असं नाही, तर त्यांना आयफोन न वापरण्याचा आदेश दिला गेला आहे. हा आदेश देणारा दुसरा तिसरा कुणीही नसून खुद्द फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिला आहे. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक कर्मचाऱ्यांना आयफोन सोडून अँड्रॉइड वापरण्याचा आदेश दिला आहे. या विचित्र निर्णयाचे कारण काय तर अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी सर्वात मोठा डेटा सिक्यूरिटी स्कॅण्डल, केंब्रिज अॅनालिटिका बाबतीत फेसबुकवर टिका केली होती.

एका इंटरव्ह्यु मुलाखतीमध्ये कूक यांनी फेसबूकवर टीका करीत सांगितले होते की, “आम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करणार नाही. प्रायव्हसी आमच्यासाठी एक मानवी हक्क आहे. हे नागरी स्वातंत्र्य आहे.” मग पुन्हा, जेव्हा रिकोडच्या केरा स्वीशरने कूकला कुक यांना विचारले की, ते मार्क झकरबर्ग असते तर त्यांनी काय केले असते, यावर कुकने उत्तर दिले “मी या परिस्थितीत नाही.” न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात रशियन हस्तक्षेपानंतर फेसबुकच्या आत काय होते आणि कॅंब्रिज अॅनालिटिका विवादानंतर कंपनीच्या पुढील हाताळणीबद्दल तपशीलवार माहिती दिली गेली आहे. कुक यांच्या वक्तव्यामुळे झुकरबर्गला नक्कीच राग आला आहे. नंतर त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाला केवळ अँड्रॉइड फोनचा वापर करण्यास सांगितले. तसेच अँड्रॉइडचा युजर बेस अॅपलपेक्षा खूप मोठा आहे. झुकरबर्गने यावर प्रत्युत्तर देताना सांगितले की, कूकने ही टिप्पणी अतिशय निष्काळजीपणे दिली होती.

- Advertisement -

न्यूयॉर्क टाइम्सच्या आधारे फेसबूक एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी अन्य बातम्यांच्या साइटवर जसे की एन.टी.के. नेटवर्कवर मुद्दाम नकारात्मक लेख पसरवले आहेत. टिम मिलर्सने एनवायटीला सांगितले की, ऍपल फेसबूकचा थेट स्पर्धक नसून, हा वाद कूकने टीका केल्यामुळे झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -