घरट्रेंडिंग'मार्क झुकरबर्ग' जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती!

‘मार्क झुकरबर्ग’ जगातील तिसरी श्रीमंत व्यक्ती!

Subscribe

फेसबुकचा सर्वेसर्वा असलेल्या मार्क झुकरबर्गला जगातील श्रीमंत माणसाच्या यादीत 'तिसरे' स्थान मिळाले आहे.

फेसबुकचा कर्ताधर्ता असेलल्या मार्क झुकरबर्गला कोण ओळखत नसेल तरच नवल. मार्क झुरबर्गने नुकतंच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना मागे टाकत तिसरा नंबर पटकवला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये फेसबुकचा फाउंडर मार्क झुरबर्गला तिसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. ब्लूमर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या अहवलानुसार, जगातीस श्रीमंतांच्या यादीत मार्क झुरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर असून, अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स पहिल्या २ क्रमांकावर आहेत. शुक्रवारी फेसबुकच्या शेअर्सच्या किमतीत अचानक २.४ टक्क्याच्या फरकाने वाढ झाली. यामुळे मार्क झुकरबर्गच्या संपत्तीमध्ये चांगलीच उलाढाल झाली आणि त्याला तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीते स्थान मिळाले. विशेष म्हणजे जगतील टॉप-3 श्रीमंत व्यक्ती या टेक्नॉलॉजी व्यवसायाशीच निगडीत आहेत.

मार्कची एकूण संपत्ती :

३४ वर्षीय मार्क झुकरबर्गच्या एकूण संपत्तीची आकडेवारी ब्लूमर्ग बिलेनिअर इंडेक्सने जाहीर केली आहे. या अहवलानुसार झुकरबर्गची एकूण संपत्ती ५.५ लाख करोड रुपये (८,१६० कोटी डॉलर) इतकी आहे. ही संपत्ती वॉरेन बफेन यांच्या संपत्तीपेक्षा तब्बल २५३६.४ कोटी रुपयांनी जास्त आहे. वॉरेन बफेन हे जगातले सर्वात मोठे आणि अग्रगण्य गुंतवणूकदार आहेत. त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करुन कमाई केली आहे. बर्कशायर हॅथवे असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे.

- Advertisement -

टेक्नॉलॉजीशी निगडीत व्यावसायिकांची बाजी!

ब्लूमर्ग बिलेनिअर इंडेक्स यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत टेक्नॉलॉजी व्यवसायाशी निगडीत व्यावसायिकच पुढे आहेत. या अहवालानुसार टेक्नॉलॉजी बिझनेसशी संबंधित लोकांची संपत्ती ५ ट्रिलीयन डॉलरहून अधिक आहे. हा आकडा अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा खूप मोठा आहे. याशिवाय समोर आलेल्या माहितीनुसार मार्क झुकरबर्गला या वर्षाच्या सुरुवातीला मात्र खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. फेसबुकवरील डेटा लिक प्रकरणामुळे मार्कला या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी जगातील श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्गचा ७ वा नंबर होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -