घरट्रेंडिंगHathras Rape Victim च्या नावाने WhatsApp वर आलेला फोटो फॉरवर्ड करु नका

Hathras Rape Victim च्या नावाने WhatsApp वर आलेला फोटो फॉरवर्ड करु नका

Subscribe

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात असंतोषाचे वातावरण असतानाच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या घटनेत बळी पडलेल्या पीडितेचे फोटो व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअपवर आलेला फोटो आपण सहानुभूतीच्या नात्याने पुढे फॉरवर्ड करतो. फोटोसोबत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहीजे, असाही मेसेज असतो. आपण सुजाण नागरिक असल्याच्या अर्विभावात असले मेसेज फॉरवर्ड करतो. पण WhatsApp वर आलेली माहिती आपण क्रॉस चेक करत नाही. त्यामुळे हाथरस बलात्कार पीडितेच्या ऐवजी एका वेगळ्याच मुलीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या फोटोतील मुलीमध्ये आणि हाथरसच्या पीडितेमध्ये केवळ एकच साम्य आहे. ते म्हणजे दोघींचे नाव एकच आहे. त्याव्यतिरीक्त त्यांचा एकमेकींशी कोणताही संबंध नाही. WhatsApp वर आलेल्या फोटोतील तरुणी एका ऊसाच्या शेतासमोर उभी आहे. फोटोसोबत लिहिलेले आहे की, “या निष्पाप मुलीसोबत जे घडलंय ते वाचून अंगावर काटा उभा राहतो. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. आता बदल हवाच.”

- Advertisement -

मग सत्य काय आहे?

खरंतर व्हायरल होणाऱ्या फोटोतील मुलीचा दोन वर्षांपुर्वीच मृत्यू झालेला आहे. पंजाबमधील चंदिगढ येथील या मुलीचा एका आजारामुळे या मुलीचा मृत्यू झाला होता. मात्र तिचा फोटो हाथरसची पीडिता म्हणून व्हायरल झाल्यावर कुटुंबियांना धक्काच बसला. या मुलीच्या वडिलांनी आता पोलिसांत देखील तक्रार दिली आहे. वडिलांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मुलीचा २०१८ साली मृत्यू झाला होता. मात्र आता तिचे फोटो कुणीतरी व्हायरल करत आहे. याला जे लोक जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी.

हाथरसची घटना काय आहे?

हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका दलित मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करुन तिला अमानुष पद्धतीने मारहाण केली होती. या मारहाणीमुळे पीडित तरुणी पॅरालाईज झाली होती. तब्बल १५ दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले, मात्र डॉक्टरांना तिला वाचविण्यात यश आले नाही. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारविरोधात देशभरातून असंतोष व्यक्त होत आहे. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आज हाथरसचे पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -