‘अभिनंदन चायवाला’ व्हायरल झालेला ‘तो’ फोटो फेक

अभिनंदन वर्थमान यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट उघडले जात आहे, तर त्यांचे मॉर्फ केलेले फोटो देखील व्हायरल होत आहेत. असाच एक प्रकार लंडनमधील हॉटेलशी संबंधित घडला आहे.

Mumbai
abhinandan chaiiwala
अभिनंदन चायवाला.. व्हायरल झालेला फेक फोटो

भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आता भारतासहीत जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत. अभिनंदनच्या शौर्याला देशातीलच नाही तर जगभरातील लोकांनी दाद दिली. अभिनंदनच्या या प्रसिद्धीचा फायदा घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. काहींनी त्यांच्या मिशीची स्टाईल कॉपी केली आहे, तर काही उतावीळरावांनी अभिनंदन यांच्यावर चित्रपट येणार असल्याची आवई उठवली. आता मात्र कहरच झाला. लंडनमधील एका हॉटेलने अभिनंदन यांचा मुखवटा आपल्या दुकानाच्या फलकावर लावल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र माय महानगरने केलेल्या तपासणीत हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे.

लंडनच्या वॉल्थॅमस्टो येथे चायवाला नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलने अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांचा चहा पितानाचा फोटो आपल्या फलकावर लावल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. अभिनंदन यांना जेव्हा पाकिस्तानने युद्धकैदी म्हणून पकडले होते. तेव्हा त्यांना चहा प्यायला दिली होती. चहा पितानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे चायवाला नामक हॉटेलने अभिनंदनला आंदराजली वाहिली, असा बनाव करणे काही लोकांना शक्य झाले.

abhinandan chaiiwala fact check photo
व्हायरल झालेला फोटो आणि खरा फोटो

माय महानगरच्या टीमने या प्रकाराची शहानिशा करण्याचे ठरवले. तेव्हा असे लक्षात आले की लंडन येथे चायवाला नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या ईमेल आयडीवर संपर्क साधला असता, असा कोणताही फोटो त्यांनी लावला नसल्याचे सांगितले. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मात्र अभिनंदनचा चायवाला हा फोटो वेगात व्हायरल होत आहे. आम्ही चायवाला हॉटेलशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांचा आताचा फोटो आम्हाला पाठवला. या फोटोवर कुठेही अभिनंदनचा मुखवटा लावलेला दिसत नाही.

chaiiwala tea shop email
चायवाला या हॉटेलने रिप्लायमध्ये हा फोटो फेक असल्याचे सांगितले

चायवाला या हॉटेलला स्वतःचा इतिहास आहे. आताचे हॉटेलचे मालक हे १९३० ला दिल्लीच्या रस्त्यावर चहा विकण्याचे काम करायचे. त्यानंतर त्यांनी लंडन येथे स्वतःचे हॉटेल सुरु केले. सध्या युकेमध्ये चायवाला हॉटेलचा महिन्याला १० लाख कप चहा विकला जातो. तसेच लवकरच चायवालाचे भारतातही पदार्पण होणार आहे, या हॉटेलचे नाव ‘चायवाला ऑफ लंडन’ असेल, असेही चायवालाने आम्हाला दिलेल्या रिप्लायमध्ये सांगितले.

हे वाचा – पाकिस्तानकडून भारतीय सैनिकांचे खोटे व्हिडिओ व्हायरल; लष्कराचा सावधानतेचा इशारा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here