पाकिस्तानकडून भारतीय सैनिकांचे खोटे व्हिडिओ व्हायरल; लष्कराचा सावधानतेचा इशारा

पाकिस्तानच्या सायबर आर्मीकडून भारतीय सैनिकांचे खोटे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओपासून सावध राहण्याचा इशारा भारतीय लष्काराने दिला आहे.

Mumbai
false video run against indian army, guard against lie says indian army
पाकिस्तानच्या सायबर आर्मीकडून भारतीय सैनिकांचे खोटे व्हिडिओ व्हायरल

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर वाढत चाललेल्या तणावाचे प्रतिबिंब सोशल मीडियावर देखील उमटू लागलेले आहे. उलटपक्षी सीमेवर कमी पण सोशल मीडियावरच युद्ध पेटले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पाकिस्तानकडून सोशल मीडियावर सतत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यावर भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करुन उत्तर दिले आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांकडून सोशल मीडियावर खोटा आणि फसवणूक करणारा कटेंट पसरवला जात आहे, अशा फेक कटेंटपासून सावध राहण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.

प्रकरण काय आहे

सारा शेख नावाच्या अकाऊंटवरून भारतीय सैनिकांच्या बाबतीत फेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत. सारा शेख स्वतःला पाक सायबर आर्मीची सदस्य म्हणवून घेते. लष्कराने साराच्या ज्या ट्विटवर आक्षेप घेतलाय, त्या ट्विटमध्ये भारतीय सैनिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले गेले आहे. भारतीय सैनिकांमध्ये फूट पाडण्यासाठी असे व्हिडिओ शेअर होत असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. सारा शेखने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय लष्कर अधिकारी त्यांच्यापेक्षा खालच्या सैनिकांना आणि पॅरामिलिटरी जवानांना नोकरासारखी वागणूक देतात. तसेच दलित सैनिकांचा लष्करात छळ होत असल्याचे देखील या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

भारतीय लष्काराने दावा फेटाळला

भारतीय लष्काराने देखील याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद्यांकडून भारतीय सैनिकांच्याविरोधात #MisInformationCampaign राबवले जात असल्याचे लष्कराच्यावतीने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगण्यात आले आहे. दहशतवादी पुरस्कृत असलेले लोक अफवा पसरवत आहेत. त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here