घरट्रेंडिंगशेतकऱ्याची अनोखी शक्कल कुत्र्याला बनवलं वाघ; वाचा कारण

शेतकऱ्याची अनोखी शक्कल कुत्र्याला बनवलं वाघ; वाचा कारण

Subscribe

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. त्यात शेतकरी हा अनेक जुगाड लावून नवनवे प्रयोग करत असतो. कर्नाटकच्या एका शेतकऱ्याने केलेला जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. आपल्या शेतातील पिकांची माकडं नासधूस करतात. या माकडांवर जरब बसावी म्हणून या शेतकऱ्याने चक्क कुत्र्यालाच पट्टेरी वाघाच्या रंगात रंगवले आहे. या रंगवलेल्या खोट्या वाघाला बघून तरी माकडांनी घाबरावं, यासाठी ही अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे.

श्रीकांत गौडा असे या शेतकऱ्याचे नाव असून तो थिरथाहल्ली तालुक्यातील नलूरू गावाचा रहिवासी आहे. चार वर्षापूर्वी त्याने उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे असाच एक प्रयोग केला होता. आपल्या शेतात वाघाची प्रतिकृती असलेली बाहुली ठेवल्यामुळे माकडं त्याला घाबरून शेतात येत नव्हती. श्रीकांतच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने वाघाची बाहुली शेतात दुसऱ्या कोपऱ्याला ठेवून पाहिलं. त्याठिकाणी देखील माकडं बाहुलीला पाहून जवळ येत नव्हते. बाहुलीला घाबरून माकडं येत नसली तरी बाहुलीवर फार काळ अवलंबून राहता येणार नाही, याची जाणीव श्रीकांत गौडाला झाली.

- Advertisement -

त्यानंतर या शेतकऱ्याने त्याच्या कुत्र्यालाच वाघाचा रंग देण्याचा निर्णय घेतला. डेक्कन हेराल्ड या वृत्तपत्राशी बोलताना श्रीकांतने सांगितले की, हेअर डाय वापरून हा रंग लावण्यात आला. अशाच प्रकारची एक कल्पना चिदानंद गौडा नामक शेतकऱ्याने राबविली होती. आपल्या शेतात स्पिकरवर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज लावून हा शेतकरी माकडांना पळवून लावायचा.

यापूर्वी देखील उडुपी जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित शेतकऱ्याने हीच कल्पना राबवली होती. नागराज मेस्था नामक या शेतकऱ्याने कुत्र्याला वाघाच्या रंगात रंगवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -