घरट्रेंडिंगप्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; ४० लाखांहून अधिक युजर्सचं प्री-रजिस्ट्रेशन

प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; ४० लाखांहून अधिक युजर्सचं प्री-रजिस्ट्रेशन

Subscribe

PUBG सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा झाली तेव्हापासून पब्जी चाहत्यांमध्ये या गेमची आतुरता

जगभरात PUBG हा गेम प्रचंड लोकप्रिय ठरला. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गेमची क्रेझ होती. मात्र केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह ११८ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. PUBG भारतात बॅन केल्यानंतर पब्जी चाहत्यांमध्ये निराशा पसरली. PUBG सारखाच भारतीय गेम FAU-G ची घोषणा झाली तेव्हापासून पब्जी चाहत्यांमध्ये या गेमची आतुरता आहे. दरम्यान, पब्जी प्रेमींमध्ये उत्सुकता असेलेला भारतीय FAU-G गेम प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. PUBG ला बॅन करण्यात आलेला मोबाईल गेम, Mobile FAU-G चा पर्याय असून या गेमसाठी लॉन्च होण्यापूर्वीच ४० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. FAU-G चे डेव्हलपर्स nCore ने यासंदर्भातील माहिती शेअर केली. दरम्यान, या गेमचं प्री-रजिस्ट्रेशन गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरिस सुरु करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेम FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुगल प्ले-स्टोरवर अवघ्या २४ तासांमध्ये १०.६ लाख युजर्सनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केले होतं. आता ही संख्या ४ पटींनी वाढली आहे. आतापर्यंत ४० लाख युजर्सनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केले आहे.

- Advertisement -

बनावट FauG गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले होते. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

असा करता येणार FauG डाऊनलोड

  • फौ-जी गेम लॉन्च झाल्यानंतर युजर्ससाठी हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध होऊ शकेल.
  • त्याचसोबत हा गेम ऑफिशिअल साईटवरुनही डाऊनलोड करता येईल.
  • सध्या फौ-जी गेमची ऑफिशिअल वेबसाइट लॉन्च झालेली नाही.
  • गेमबाबत सर्व माहिती गेमचे प्रमोटर्स nCore गेम्स मार्फत देण्यात येत आहे.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -