घरट्रेंडिंगफुटबॉल वर्ल्डकपदरम्यान ट्विटरवर ११,५०० कोटी ट्विट इंप्रेशन्स

फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान ट्विटरवर ११,५०० कोटी ट्विट इंप्रेशन्स

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा सोशल मीडियावर फिव्हर पहायला मिळाला. लोकप्रिय सोशल मीडिया साईट ट्विटरवर यंदाच्या वर्ल्डकपदरम्यान करोडो ट्विट्स करण्यात आले. यंदा फिफा वर्ल्डकपबाबत तब्बल ११५०० कोटी ट्विट्स करण्यात आले.

जगभरात मोठ्या प्रमाणात लोक सोशल मीडिया साईट्सवर अॅक्टीव्ह आहेत. त्यामध्ये ट्विटर ही सोशल मीडिया साईट सर्वाधिक पसंतीच्या साईट्सपैकी एक मानली जाते. त्यामुळे लोक दिवसभरात जे काही घडते अथवा त्यांचे विचार ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर मांडत असतात. त्यामुळे फुटबॉल वर्ल्डकपरदरम्यान या खेळाचे चाहते ट्विटरवर सामन्यांबाबत व्यक्त होत होते. वर्ल्डकपदरम्यान जगभरातील चाहत्यांनी फुटबॉल सामन्यांदरम्यान केलेल्या करोडो ट्विट्समुळे ११,५०० कोटी ट्विट इंप्रेशन्स आल्याची माहिती ट्विटरने जाहीर केली आहे. एखाद्या घटनेसंदर्भात ट्विटरवर इतके ट्विट इंप्रेशन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या बाजुला फ्रान्सचा खेळाडू किलियन एमबापे हा ट्विटरवर स्टार झाला आहे. त्याने अंतिम सामन्यात फ्रान्सकडून चौथा तर विश्वकप स्पर्धेतला शेवटचा गोल केला होता. त्यामुळे त्याच्या नावाचा हॅशटॅग वापरून केलेल्या तसेच त्याला टॅग केलेल्या ट्विट्सवर सर्वाधिक प्रमाणात ट्विट इंप्रेशन्स मिळाले आहेत. त्यामुळे स्पर्धेतला अंतिम गोल करुन एमबापे ट्विटरवर स्टार ठरला आहे. सामना संपल्यानंतर त्याने केलेला शेवटचा गोल ट्विटरवर चर्चेचा विषय ठरला होता.

एमबापे ठरला स्टार!

जगभरातील बहुतांश देशांमध्ये फुटबॉल हा प्रमुख खेळ आहे. अख्ख्या जगाला वेड लावणारा फुटबॉल वर्ल्डकप नुकताच पार पडला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवत विश्वकप फ्रान्सच्या नावावर केला. अंतिम सामन्यात फ्रान्सने चार गोल केले. फ्रान्सचा खेळाडू किलियन एमबापे याने शेवटचा गोल केला आणि तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार ज्यूनियरने मैदानामध्ये बॉल पास करण्याऐवजी मैदानात पडण्याचे नाटक केले. हा प्रकारदेखील ट्विटरवर मोठ्या प्रमाणात चघळला गेला. नेमार या स्पर्धेतला सर्वाधिक चर्चित खेळाडू ठरला. उप उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभूत झालेल्या ब्राझीलच्या टिमबाबात सर्वाधिक चर्चा होताना दिसली. त्यानंतर क्रमांक येतो फ्रान्स आणि लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा. सर्वाधिक ट्विट अंतिम सामन्याच्या वेळी केले गेल्याची माहिती ट्विटरने दिली आहे.

- Advertisement -

एमबापे या शतकातला पेले

एमबापे हा यंदाच्या वर्ल्डकपमधला सर्वात तरुण खेळाडू ठरला. परंतु त्याने त्याच्या खेळातून मूर्ती लहान पण किर्ती महानची प्रचिती घडवली. फ्रान्समध्ये त्याला या शतकातला पेले म्हटले आहे. १९५८ साली वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पेले यांनी ब्राझीलसाठी गोल केला होता. १९९८ साली वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात जिदान या खेळाडुने गोल केला होता. यो दोन्ही खेळाडुंना प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट या पूरस्काराने सन्मानित केले होते.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -