घरट्रेंडिंग‘मासे’ खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य !

‘मासे’ खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य !

Subscribe

माशांमधील 'ओमेरा-३' या घटकामुळे कॅन्सर तसंच हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसंच अकाली मृत्यूचं प्रमाण घटतं, असा संशोधकांचा दावा आहे.

‘मासे’ खाण्याऱ्या लोकांचं प्रमाण आपल्या देशात खूप मोठं आहे. अनेक लोक मांसाहरामध्ये मासे खाण्याला अधिक प्राधान्य देतात. विशेशषत: पश्चिम बंगाल तसंच देशाच्या अन्य किनारपट्टीवरील प्रदेशांत मासे खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. उपलब्ध माहितीनुसार जपान, चीन, अमेरिका आणि फ्रान्स या देशांमधील लोक आपल्या आहारात माशांचा मोठ्याप्रमाणावर समावेश करतात. दरम्यान याबाबतचा एक नवा अभ्यास नुकताच समोर आला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मांसाहारातील अन्य पदार्थांच्या तुलनेत मासे खाणं हे आरोग्यासाठी लाभदायक आणि सुरक्षित आहे. मासे खाणं अनेक आजारांसाठी आणि विकारांसाठी फायदेशीर असून माशांमधील ‘ओमेरा-३’ या घटकामुळे कॅन्सर तसंच हृदयरोगाचा धोका कमी होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पर्यायाने मासे खाण्यामुळे अकाली किंवा कमी वयात उद्भवणाऱ्या मृत्यूचा धोका टळत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

काय सांगतो अभ्यास ?

हा शोध चीनच्या जेजियांग युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी लावला असून, यासाठी त्यांनी चीन देशातील लोकांचा विशेष सर्व्हे केला होता. या अभ्यासासाठी त्यांनी २ लाख ४० हजार ७२९ पुरुषांचा तर १ लाख ८० हजार ५८० महिलांचा तब्बल १६ वर्ष सर्व्हे केला. या काळामध्ये सर्व्हेसाठी निवडेलेल्यांपैकी ५४ हजार पुरुषांचा आणि ३० हजार ८८२ महिलांचा मृत्यू झाला. या पहाणीमध्ये संशोधकांना ओमेगा-३ या अॅसिडमध्ये आणि मृत्यूच्या दरात होणारी घट यामध्ये महात्वाचा संबंध असल्याचे दिसून आले. जे स्त्री-पुरुष नियमीत मासे खात होते त्यांच्या मृत्यू दरमामध्ये ९ टक्क्यांनी घट झाली होती. तसंच मासे खाणाऱ्यांमध्ये हार्ट-अॅटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी तर कॅन्सरमुळे मरणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी होते. याशिवाय मासे खाणाऱ्या लोकांमध्ये श्वसनसंबंधीच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी असल्याचे, संशोधकांना या अभ्यासात लक्षात आले. दरम्यान या संशोधनाची सविस्तर माहिती ‘इंटरनल मेडिसन’ या मेडिकल नियतकालिकेमध्ये देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -