…म्हणून सोशल मीडियावर सुरु आहे #LastNormalPic चा ट्रेंड

यामुळे सोशल मीडियावर #LastNormalPic चा ट्रेंड सुरु आहे.

Mumbai
fun food to eating people are sharing last piece they clicked before lockdown
सोशल मीडियावर सुरु आहे #LastNormalPic चा ट्रेंड

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनला तब्बल दोन महिने होत आले आहे. मात्र, परिस्थिती जैसे थै आहे. लॉकडाऊन असून देखील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशात चौथा लॉकडाऊन देखील वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेक नागरिक घरामध्ये बसून कंटाळले आहेत. तसेच त्यांना आधीच्या जुन्या गोष्टी आठवू लागल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी फिरायला गेलेले ठिकाण. त्यावेळी काय काय खाल्ले ते. काय मज्जा केली ते क्षण आठवून त्या गोष्टी आता नागरिक मिस करु लागला आहे.

दरम्यान, विशेष करुन लोक सोशल मीडियावर लास्ट आउटिंग आणि बाहेर खाल्लेल्या पदार्थांचे फोटो शेअर करत आहेत. यामुळे सोशल मीडियावर #LastNormalPic चा ट्रेंड सुरु आहे.


हेही वाचा – Video: वाहनांनी नाही तर मोरांमुळे झालं रस्त्यात ट्राफिक जाम… तुम्हीच बघा!