घरट्रेंडिंगवॅक्यूम क्लीनरच्या संशोधकांना गूगलने दिली मानवंदना

वॅक्यूम क्लीनरच्या संशोधकांना गूगलने दिली मानवंदना

Subscribe

गुगलने आज 'डूडल'मार्फत प्रसिद्ध अभियांत्रिक हबर्ट सेसिल बूथ यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे

जगभरात विविध क्षेत्रांमध्ये नाविण्यपुर्ण काम केलेल्या व्यक्तींना गुगल आपल्या ‘डूडल’मार्फत आदरांजली वाहत असतो. गुगलने आज आपल्या याच ‘डूडल’मार्फत प्रसिद्ध अभियांत्रिक हबर्ट सेसिल बूथ यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज हबर्ट सेसिल बूथ यांची १४७ वी जयंती आहे. हबर्ट सेसिल बूथ यांनी ‘पावर्ड वॅक्यूम क्लीनर’चा शोध लावला होता. त्यांनी शोध लावण्या अगोदरचा वॅक्यूम क्लीनर माती दूर सारत होता. मात्र, त्यांच्या संशोधनातला वॅक्यूम क्लिनर कचऱ्या बरोबरच माती देखिल शोषून घेतो.

काय आहे आजच्या गूगल ‘डूडल’मध्ये?

आजचे गूगल डूडल हे एक अॅनिमेटेड डूडल आहे. हे डूडल दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. एका भागात एक बाई आणि एक माणूस आहे. त्या माणसाच्या हातात वॅक्युम क्लीनर असून तो त्या वॅक्यून क्लीनरने लादी साफ करतोय. तर दुसरीकडे, घोडा आणि टांगाचा एक फोटो आहे. त्या फोटोवर क्लीक केले की, त्या डूडलशी संबंधित पेजेस उघडतात. बूथ यांच्या संशोधना अगोदरचे वॅक्युम हे माती प्रेशरने दूर सारत होते.

- Advertisement -

 

जाणून घ्या हबर्ट सेसिल बूथ यांच्या विषयी

हबर्ट सेसिल बूथ यांचा जन्म ४ जूलै १८७१ रोजी इंग्लंडच्या ‘ग्लॉसेस्टर’मध्ये झाला होता. त्यांचे सुरुवातीचे ‘ग्लॉसेस्ट कंट्री स्कूल’ आणि ‘ग्लॉसेस्टर कॉलेज’मध्ये झाले. १८ वर्षाच्या वयात ते लंडनच्या ‘सेंट्रल टेक्निकल कॉलेज’ची प्रवेश परिक्षा पास झाले. त्या महाविद्यालयाला आज ‘सिटी अॅन्ड गिल्डस् इंजेनिअरिंग कॉलेज’ म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना लगेच त्या काळातील नामांकित ‘मॉडस्ले’ नावाच्या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यानंतर ते ‘ब्रिटीश वॅक्यूम क्लीनर अॅण्ड इंजिनिअरिंग कंपनी’चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर होते. १८८४ ते १८९८ मध्ये त्यांनी लंडनच्या ‘अम्युजमेंट पार्क’च्या ‘फेरी विल्स’ची डिजाइन बनवली होती. बेल्जिअमच्या स्टील फॅक्ट्रीची संपूर्ण डिजाइन त्यांनीच बनवले होते. बूथ यांनी १९०३ ते १९४० पर्यंत अभियांत्रिकेचे काम केले. बूथ यांचा मृत्यू १४ जानेवारी १९५५ रोजी इंग्लंडच्या क्रॉयडॉनमध्ये झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -