घरट्रेंडिंगक्रिकेटच्या 'डॉन'ला Google डुडलची सलामी!

क्रिकेटच्या ‘डॉन’ला Google डुडलची सलामी!

Subscribe

सर ब्रॅडमन यांची अखेरच्या कसोटी सामन्यात 'सेंचुरी' हुकल्याचं दु:ख, कायम त्यांच्या मनात राहिल्यांच काही लोक सांगतात

‘द डॉन ऑफ क्रिकेट’ अशी ख्याती मिळवलेले एकमेव खेळाडू म्हणजे सर डोनाल्ड जॉर्ड ब्रॅडमन. क्रिकेटमध्ये आपल्या अफाट खेळीने नावलौकिक मिळवलेल्या डोनाल्ड ब्रॅडमन अर्थात ‘सर डॉन ब्रॅडमन’ यांची आज ११० वी जयंती. यानिमित्ताने गुगलने त्यांच्या खास डुडलमधून मानवंदना वाहिली आहे. ‘सर डॉन ब्रॅडमन’ यांचं डुडल तयार करत गुगलने त्यांना खास आदरांजली वाहिली आहे. यानिमित्ताने आपणही जाणून घेऊया, या दिग्गज क्रिकेटरविषयी. १९०८ साली ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये ब्रॅडमन यांचा जन्म झाला. क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी बॅट्समन अशी त्यांची ख्याती आहे. दमदार बॅटिंगमुळे क्रिकेट प्रेमींची मनं जिंकलेल्या ब्रॅडमन यांनी अनेक वर्षं मैदान गाजवले. आजही जगभरातील अनेक तरुण बॅट्समन त्यांना आपला आदर्श मानतात. २००१ साली वयाच्या ९१ व्या वर्षी ब्रॅडमन यांचं निधन झालं.
Sir Donald George Bradman 1
सर डोनाल्ड जॉर्ड ब्रॅडमन (सौजन्य- सोशल मीडिया)
ब्रॅडमन यांनी एकूण ५२ कसोटी सामने खेळले असून सर्व सामन्यात त्यांच्या रन्सची सरासरी ९९.९४ इतकी होती. जागतिक क्रिकेटमधील ही आजवरची सर्वोत्कृष्ट सरासरी ठरली आहे. ब्रॅडमन यांच्य अखेरच्या टेस्टमध्ये केवळ ४ रन्सनी त्यांची सेंच्युरी हुकली होती. त्यावेळी इंग्लंडचे माजी लेग स्पिनर होलिज यांनी त्यांची विकेट घेतली होती. दरम्यान अखेरच्या सामन्यात सेंचुरी हुकल्याचं दु:ख कायम ब्रॅडमन यांच्या मनात राहिल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. ब्रॅडमन यांनी त्यांच्या कसोटी सामन्यातील कारकिर्दीत एकूण २९ सेंच्युरी आणि १३ हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे. एका कसोटी सामन्यामध्ये ब्रॅडमॅनने यांनी ट्रिपल सेंच्युरी (३३४ रन्स) केली होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -