आला गुगल ‘सँटा ट्रॅकर’

गुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला खाली एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे खेळ खेळू शकणा आहात.

Mumbai
इथे आहे गुगलचा सँटा ट्रॅकर
इथे आहे गुगलचा सँटा ट्रॅकर

डिसेंबर महिन्यात येणारा नाताळ सण लहान मुलांचा आवडता. लाल डगला, पांढरी दाढी असलेला सँटा क्लॉज त्याच्या पोथडीतून काढून लहान मुलांना गिफ्ट देतो. म्हणून लहान मुले सँटाक्लॉजची वाट पाहत असतात. पण आता २५ डिसेंबर पर्यंत सँटाची वाट पाहण्याची गरज नाही. कारण गुगलने खास तुमच्यासाठी सँटा लवकर आणला आहे. आता कसा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल नाही का? तर गुगलने खास लहानमुलांसाठी नाताळविशेष गेम्स आणले आहेत. ज्याचा आनंद लहान मुलांना लुटता येणार आहे.

google_tracker
गुगलच्या होमपेजवर गेम खेळण्यासाठी इथे क्लिक करा
google_games
सँटा ट्रॅकरमधील गेम

गुगलची खास भेट

गुगल दरवर्षी डिसेंबर महिन्यात लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या गोष्टी करत असते. यंदा देखील काही खास ऑनलाईन खेळ लहान मुलांसाठी आणले आहेत. हे खेळ नुसतेच मनोरंजन करणारे नाहीत. तर मुलांच्या बुद्धीला चालना देणारे आहेत. यात गणित, बुद्धिमत्ता, चित्रकला असे अनेक विषय आहेत.

कुठे मिळतील खेळ?

गुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला खाली एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे खेळ खेळू शकणा आहात. लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही हे खेळ रोखून धरतात. मुळात विचार करुन हे सगळे खेळ खेळण्याचे असल्यामुळे लहान काय मोठे काय ? हे खेळ खेळायसा मजा येते हे मात्र नक्की !

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here