१६ व्या वर्षात पदार्पण करत, गुगल मॅपचे भारतीयांसाठी खास फिचर्स

गुगल मॅपला १५ वर्ष झाली असून नवीन फिचर्सह त्याने १६व्या वर्षात पदार्पन केले आहे. गुगल अर्थच्या सहाय्याने २००५ पासून सुरू झालेले गुगल मॅप आता सगळ्यात जास्त वापली जाणारी मॅपिंग सर्व्हिस आहे.

Mumbai
pichai loanch google map new logo
गुगल मॅपचे भारतीयांसाठी खास फिचर्स

पूर्वी अनोळख्या ठिकाणी गेल्यावर, तेथील स्थानिक दुकानदारांना पत्ता विचारल्याशिवाय पुढे जाणे अवघड असायचे. मात्र, याची सवय मोडून गुगल मॅप आता तरूणाईच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. या गुगल मॅपला १५ वर्ष झाली असून नवीन फिचर्सह त्याने १६व्या वर्षात पदार्पण केले आहे. गुगल अर्थच्या सहाय्याने २००५ पासून सुरू झाले आहे. हे गुगल मॅप आता सगळ्यात जास्त वापले जाणारे मॅपिंग सर्व्हिस आहे. युजर्सह गुगल मॅपचा वापर हा उबेर, ओला, स्विगी सारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यादेखील गुगल मॅपचा वापर करतात.

गुगलचे सीइओ सुंदर पिचई यांनी ब्लॉगच्या माध्यमातून गुगल मॅपला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘टॅक्सी चालकाला रस्ता ठाऊक नसताना, गुगल मॅपच्या मदतीने मी टॅक्सी चालकाला रस्ता सांगितला. गुगल मॅपला यशस्वी करण्यासाठी इंजिनिअरसह युजर्सचाही वाटा यात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील प्रवासात गुगल मॅपने अचूकपणे इच्छित स्थळी पोहचवले असल्याचे सांगत, गुगल मॅपचा प्रवास आणि आपले अनुभव सांगताना त्यांनी युजर्सचे आभार मानले आहेत’.

 

१६ व्या वर्षात गुगल मॅपचे नवे बदल

गुगल मॅपच्या लेटेस्ट अपडेटसह नवीन फीचर्सचा देखील यात सहभाग आहे. या नव्या फीचरमध्ये Explore, Commute, Save, Contribute and Updates या पाच टॅबचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी युजर्सना Commute, Explore हे दोन टॅबच केवळ वापरता येत होते. मात्र, आता या टॅबच्या मदतीने सर्व ठिकाणांची रेटींग, त्यासोबतच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळणार आहे. Commute टॅबच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जवळचे आणि सोपे रस्ते कोणते आहेत हे पाहता येणार आहे. या टॅबकरीता युजर्सना आपले रोजच्या प्रवासाचे रूटीन सेट करावे लागणार आहे.

भारतीयांसाठी गुगल मॅपचे खास फिचर्स

गुगल मॅपने खास भारतीयांसाठी नवे फिचर्स आणले आहेत, याद्वारे युजर्सना त्यांच्या घरचा आणि ऑफिसचा पत्ता सेव्ह केल्यावर मॅपच्या सहाय्याने त्यांना वाहतूक कोंडी आणि पर्यायी रस्त्यांची माहिती मिळणार आहे. याद्वारे युजर्स आजुबाजूच्या जागांची माहिती मिळणार आहे. यातून व्यवसायिकाशी थेट संपर्क साधता येणार आहे. युजर्स या माध्यमातून केवळ रिव्हू किंवा रेटींग न देता व्हिडिओ देखील अपलोड करू शकतात. गुगलकडून, असे अनेक फिचर्स हे केवळ भारतीयांसाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी मोड आणि प्रवासाचा वेळ देखील समाविष्ट आहे.


हेही वाचा – भारतात पहिल्यांदाच लाँच होणार पोको कंपनीचा स्वतंत्र स्मार्टफोन…