घरट्रेंडिंग#MeToo पोहोचलं गुगलपर्यंत

#MeToo पोहोचलं गुगलपर्यंत

Subscribe

गलमध्ये देखील लैंगिक शोषण होत असल्याचं समोर आलं आहे. कारण, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या १३ कर्मचाऱ्यांना गुगलनं घरचा रस्ता दाखवला आहे.

#MeTooची चळवळ सध्या आपल्याकडे जोरात सुरू आहे. त्यातून अनेकांवर आरोप झाले आहेत. तर, काही प्रकरणं आता कोर्टापर्यंत गेली आहेत. गुगलमध्ये देखील महिलांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो असं जर तुम्हाला कुणी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण आता गुगलमध्ये देखील लैंगिक शोषण होत असल्याचं समोर आलं आहे. कारण लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या १३ कर्मचाऱ्यांना गुगलनं घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये सीनियर मॅनेजर आणि त्यापेक्षा मोठ्या पदावर असणाऱ्या लोकांचा देखील समावेश आहे. तर, काही लोकांना मेमो देखील पाठवण्यात आला आहे. मागील दोन वर्षामध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या ४८ जणांना गुगलनं घरी पाठवलं आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. शिवाय घरी पाठवल्यानंतर त्यांना कोणतीही नुकसान भरपाई गुगलनं दिलेली नाही.

वाचा – #MeToo – माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न, आलिया भटच्या आईचा खुलासा

#MeToo

युरोपियन देशामध्ये सुरू झालेली #MeToo चळवळ मागील वर्षापासून आपल्या देशात सुरू झाली आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा देखील फोडली. नाना पाटेकर, विकास बहल, अलोकनाथ, एम. जे. अकबर यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -