घरट्रेंडिंगघरात एसी कितीवर लावावा, हे आता सरकार ठरवणार!

घरात एसी कितीवर लावावा, हे आता सरकार ठरवणार!

Subscribe

एसीचं तापमान १८ किंवा २० वर ठेऊन गारेगार हवा खाणाऱ्यांना आता त्यांच्या संयमाची परीक्षा द्यावी लागणार आहे!

घरात बसवलेला एसी कसा वापरावा याचे सर्व अधिकार त्या घरमालकाला असतात असा सामान्यपणे प्रघात आहे. त्यामुळे आपल्या घरातला एसी आपण कसाही वापरू शकतो अशी धारणा देखील आहे. पण आता तुमचा हाच समज खोटा ठरवणारा एक सरकारी निर्णय होऊ घातला आहे. आपल्या घरातला एसी कितीवर चालवला जावा, याचे निर्देश थेट केंद्र सरकारकडून येणार आहेत. सामान्यपणे एसी हे १६ किंवा १८ अंशांवरून सुरू होतात. मग ते ३० किंवा ३२ अंशांपर्यंत देखील जाऊ शकतात. पण आता किमान किती अंशांवर एसी चालवावा, याचे निर्देश सरकार देणार आहे. आणि ते पाळणं बंधनकारक देखील असणार आहे.

१८ वर जास्त तर २४ वर लागते कमी वीज

एसीचा वापर उन्हाळ्यात सर्वाधिक होतो. उन्हातून किंवा बाहेरून दमून आल्यानंतर सगळ्यात आधी घरातला एसी लागतो (अर्थात एसी असलेल्या घरातला!). आणि एसी लावताना आपण तो सुरुवातीला लावतो थेट १६ किंवा १८ वर. हेतू हा असतो की कमी तापमानावर एसी लावला, तर लवकर थंड वाटेल. पण मुळात हा समजच चुकीचा असल्याचं इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स या संघटनेचं म्हणणं आहे. एसी १८ वर लावला किंवा २४ वर लावला, तरी खोली थंड होण्यासाठी तितकाच वेळ लागतो, पण वीज मात्र १८ वर जास्त आणि २४ वर कमी लागते.

- Advertisement -

Video : वृद्धाने वाचवला मांजरीचा जीव! इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव!

‘हवा’प्रेमींच्या संयमाची परीक्षा!

दरम्यान, हीच बाब ध्यानात घेत एसीची किमान मर्यादा ही २४ ठेवण्याचे निर्देश सर्व एसी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा आणि परिपत्रक देखील जारी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विजेची अधिक बचत करणारा आणि प्रदूषणाला आळा घालण्यात मदत करणाऱ्या इन्व्हर्टरचा देखील वापर करण्यासाठी एसी कंपन्यांना सांगण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आता घरात येताच १४ किंवा १६ किंवा १८ वर एसी लावणाऱ्यांना २४ वर एसी लावून संयमाची परीक्षाच द्यावी लागणार आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -