एकीकडे समुद्राला भरती तर दुसरीकडे वृद्ध कपलच्या प्रेमाला आलं उधाण! Romantic Dance Viral

उंचच उंच उसळणाऱ्या समुद्रासमोर प्रेमाची साक्ष देत वृद्ध कपलचा रोमॅन्टिक डान्स

एकीकडे समुद्राला भरती तर दुसरीकडे वृद्ध कपलच्या प्रेमाला आलं उधाण! Romantic Dance Viral

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू असताना काही ठिकाणी अजूनही लॉकडाऊन असल्याचे चित्र दिसते तर काही ठिकाणी नियमांचे पालन करून अनलॉक करण्यात आले आहे, मात्र या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी समुद्रावर फिरणं, ट्रेकिंग अशा गोष्टींना चांगलेच मिस केले असणार हे नक्की… लॉकडाऊनदरम्यान बऱ्याच युजर्सनी आपले आधीचे बीच, समुद्राचे जुने फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून मिस करत असल्याच्या स्टोरीज शेअर केलेल्या दिसल्यात. याच दरम्यान एका व्हिडिओने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उंचच उंच उसळणाऱ्या समुद्रासमोर प्रेमाची साक्ष देत वृद्ध कपलने रोमॅन्टिक डान्स केला असल्याचे दिसतंय. त्यांचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून युजर्सने त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

I love, love ❤️🎥 @ryanpv02 // TikTok

A post shared by Jessica Chastain (@jessicachastain) on

हा व्हिडिओ अमेरिकेतील हॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून तिने I love, love ❤️🎥 असे कॅप्शन दिले आहे. तर हा व्हिडिओ २ लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून या व्हिडिओवर लाखो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. हा खूप सुंदर व्हिडिओ असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला शेअर करत चांगलीच पसंती दिली आहे.

असा आहे हा Romantic Dance Video

या व्हिडीओमध्ये फेसळणाऱ्या समुद्र दिसत असून किनाऱ्यावर हे वृद्ध कपल रोमॅन्टिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला रोमॅन्टिक म्युझिक सुरू आणि हे वृद्ध कपल समुद्र किनाऱ्यावर डान्स करताना दिसत आहे. एकीकडे उंच लाटा दिसताना दुसरीकडे हे कपलं आपलं प्रेम डान्समधून व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


Sushant Sucide Case: कंगनाचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ सात प्रश्न!