गुढीपाडवा: ‘या’ मुहूर्तावर उभारा गुढी, अशी करा पुजा!

Mumbai

गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपूजनाचा विशेष असा मुहूर्त नसतो. सूर्योदयापासून गुढीपूजन करता येते.

गुढीपाडवा

हिंदू पंचांगानुसार, या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. त्याचसोबत हिंदू धर्मात पाडव्याच्या सणाबद्दल अनेक रुढी आणि परंपरा आहेत. पौराणीक कथेनुसार, या दिवशी भगवान ब्रम्हा यांनी सृष्टीची निर्मिती केली असल्याचे म्हटलं जातं. गुढीपाडव्या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याचे पूजन केले जाते. तसेच या दिवशी गोडधोडाचे पदार्थ बनवून नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो.

चैत्र प्रतिपदा शुभारंभः मंगळवार, २४ मार्च २०२० दुपारी २ वाजून ५८ मिनिटे

चैत्र प्रतिपदा समाप्तीः बुधवार, २५ मार्च २०२० सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटे

सगुढीपूजन केल्यानंतर सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवून ठेवावी.

अशी उभारा गुढी

गुढी उभारण्यासाठी एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल,) गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंचा वापर केला जातो. गुढीच्या भवती रांगोळी काढली जाते.गुढीला गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here