घरट्रेंडिंग'स्वातंत्र्य दिना'निमित्त टि्वटरचा मराठीतून हॅशटॅग

‘स्वातंत्र्य दिना’निमित्त टि्वटरचा मराठीतून हॅशटॅग

Subscribe

देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त # स्वातंत्र्यदिन यासारखे मराठी हॅशटॅग वापरुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जातात. अशाच शुभेच्छा टि्वटरने देखील दिल्या आहेत. टि्वटरने तमाम भारतीयांना टि्वटर इंडियाच्या अधिकृत अकाऊंटवरुन स्वातंत्र्यदिनानिमित्त खास हॅश टॅग तयार करण्यात आला आहे. हे हॅशटॅग वापरुन तुम्ही मातृभाषेत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

इतर भाषेतही तयार केले हॅशटॅग

टि्वटरने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने #IndependenceDay #स्वातंत्र्यदिन यासारखे हॅशटॅग वापरुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळसह अनेक भाषांत हॅशटॅग तयार केले आहेत. #स्वातंत्र्यदिन हा हॅशटॅग टि्वटरवर टाईप केल्यास त्यापुढे लाल किल्ल्याचा इमोजी दिसतो. दरवर्षी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोपण केले जाते. त्यामुळे या इमोजीला लाल किल्ल्याचे विशेष स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

सणाच्या दिवशी ‘खास हॅशटॅग’

सणावाराच्या दिवशी देखील टि्वटर इंडिया असेच काही खास हॅशटॅग तयार करतात. या आधी देखील टि्वटरने २०१६ साली गणेश चतुर्थीनिमित्ताने खास मराठीत वेगवेगळे हॅशटॅग तयार केले होते. असे हॅशटॅग तयार करुन युजर्सचे मन जिंकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -