‘उत्कृष्ट जेवण आणि सेक्स म्हणजे दैवी आनंद’

Having Sex And Eating Good Food Is Simply Divine said The Pope Francis
'उत्कृष्ट जेवण आणि सेक्स म्हणजे दैवी आनंद'

‘उत्कृष्ट जेवण हे तुम्हाला सुदृढ ठेवण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे सेक्समधून मिळणार आनंद हा प्रेम अधिक सुंदर होण्यासाठी होतो. तसेच सेक्स आपल्या पुढील पिढ्यांच्या निर्मितीसाठी गरजेचा आहे. त्यामुळे उत्कृष्ट जेवण आणि सेक्समधून मिळणारा आनंद हा दैवी असतो’, असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. पोप फ्रोन्सिस हे कॅथॉलिक ख्रिश्चनांसाठी पवित्र्या मानल्या जाण्याऱ्या चर्चचे प्रगतशील धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. दरम्यान उत्कृष्ट जेवण आणि सेक्स यासंदर्भात यापूर्वी करण्यात आलेल्या दाव्यांवर आणि विचारांवर पोप फ्रान्सिस यांनी टीका केली आहे आणि या गोष्टी अधिक पवित्र आणि नैतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ‘हफिंग्टन पोस्ट’ने दिले आहे.

लेखक कार्लो पेट्रिनी यांच्या टोरफ्यूचूरा (TerraFutura) या पुस्तकासाठी पोप फ्रान्सिस यांनी मुलाखत देताना जेवण आणि सेक्सबद्दल हे वक्तव्य केले आहे. बुधवारी प्रकाशित झालेल्या टोरफ्यूचूरा या पुस्तकासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत पोप फ्रान्सिस यांच्या पर्यावरण संदर्भातील विचारांचा आणि सामाजिक विचारसरणीचा मागोवा घेण्यात आला. जुन्या विचारांमुळे उत्कृष्ट जेवण आणि सेक्स या विषयांचे खूप नुकसान झाले आहे आणि याची झळ आजही जाणवत असल्याचे पोप फ्रान्सिस म्हणाले.

मागील काही वर्षांपासून पुरोगामी विचारसरणीनुसार पोप फ्रान्सिस यांचा शरीर संबंधांसंदर्भात दृष्टीकोन जास्त विस्तारीत होत असल्याचे दिसत आहे. लग्न झालेल्या जोडप्यांनी सेक्समधून मिळणार आनंद कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत त्यांनी २०१६ साली व्यक्त केले होते. तर २०१८ मध्ये त्यांनी युवकांसमोर भाष्य करताना सेक्स म्हणजे एक पुरुष आणि महिला या दोघांमध्ये आयुष्यभराच्या प्रेमाचा भावनिक संकेत असल्याचे म्हणाले होते.


हेही वाचा – Corona Vaccine: गूडन्युज! देशात पुढच्या वर्षी येणार कोरोना वॅक्सीन