हॉलिवूड अभिनेता ‘जेम्स बॉन्ड’ झाला बाबा

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता डॅनियल क्रेग २६ वर्षानंतर पुन्हा एकदा बाबा झाला आहे.

Mumbai
Hollywood actor James Bond became father
हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेग

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता डॅनियल क्रेग पुन्हा एकदा बाबा झाला आहे. सात वर्षापूर्वी डॅनियलची पत्नी रेचल वाइस हिच्या सोबत विवाह झाला होता. डॅनियलची पत्नी रेचल वाइस हिनं मुलीला जन्म दिला असून त्यांच्या घरात एक चिमुकली परी जन्माला आली असल्याने दोघेही प्रचंड आनंदात आहेत. त्यांच्या या बातमीने हॉलिवूड अभिनेता ‘जेम्स बॉन्ड’ला चाहत्यांने शुभेच्छा दिल्या आहेत. मेट्रो डॉट को डॉट यूके या वेबसाईटनुसार रेचलनं शनिवारी चिमुकलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे.

डॅनियल क्रेग २६ वर्षानंतर बाबा

डॅनियल क्रेग २६ वर्षानंतर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. डॅनियलला पहिल्या पत्नीपासून ‘एला’ ही २६ वर्षाची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी रेचलनं ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला एक मुलाखत दिली होती. मी आणि डॅनियल बाळाच्या स्वागतासाठी खूपचं उत्सुक असून बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे रेचलनं मुलाखतीच्या वेळी म्हटले होते.

❤❤❤

A post shared by Daniel Craig (@danielcraigofficialfans) on