अजिंक्य रहाणेने विचारलं वडा पाव कशासोबत आवडतो? वाचा सचिन तेंडुलकरचा रिप्लाय

Mumbai
ajinkya rahane eat vada pav
अजिंक्यने घेतला वडा पावचा आस्वाद

वडा पाव म्हणजे मुंबईची शान. मुंबईकर आणि वडा पाव यांचे अनोखे नाते आहे. मुंबईकर जगात कुठेही गेला तरी वडा पावचे नाव घेतल्यानंतर तोंडाला पाणी सुटतंच. भारतरत्न सचिन तेंडुलकर पासून ते मुकेश अंबानी पर्यंत अनेकजण या वडा पावच्या प्रेमात आहेत. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने आपल्या ट्विटरवर तुम्हाला वडा पाव कशासोबत खायला आवडतो असा प्रश्न विचारला होता? यावर सचिन तेंडुलकरने रिप्लाय देत, त्याला वडा पाव कशासोबत खायला आवडतो ते सांगितले आहे. अजिंक्यच्या या ट्विटला ट्विटरवर अनेकांनी प्रतिसाद देत त्यांची आवड सांगितली आहे.

या ट्विटला सचिन तेंडुलकरने रिप्लाय दिला आहे. “मला लाल चटणी, त्यासोबत थोडी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणीच्या मिश्रणासोबत वडा पाव खायला आवडतो” असे उत्तर सचिनने दिले आहे.

सचिन तेंडुलकरचे बालपण हे दादर, शिवाजी पार्कात गेले आहे. लहानपणी क्रिकेट खेळून झाल्यावर आम्ही सगळे वडा पाववर ताव मारायचो, अशी आठवण सचिनने अनेकदा सांगितली आहे. शिवाजी पार्कातल्या खमंग वडा पावची आजही आठवण येत असल्याचे तो सांगतो.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here