नियम बदलले! PF चे पैसे काढणे आता एकदम सोप्पे

PFचे पैसे काढण्यासाठी नियम बदलले आहे. त्यामुळे PFचे पैसे काढणे एकदम सोप्पे झाले आहे.

New Delhi
how withdraw money of pf
नियम बदलले! PF चे पैसे काढणे आता एकदम सोप्पे

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रॉविडेंट फंड (पीएफ) अत्यंत महत्त्वाचा आहे. पीएफ म्हणजे आयुष्याची खऱ्या अर्थाने जमापुंजी असते. पूर्वी पीएफचे पैसे मिळण्यासाठी तारेवरची कसरत व्हायची. लोकांना कित्येक आठवडे पीएफचे पैसे मिळवण्यासाठी वाट पाहावी लागत असे. त्यामुळे अडचणीच्या वेळी पैशांची गरज भासत असतानाही मिळत नसे. मात्र, आता तसे होणार नाही. नियम बदलल्यामुळे पीएफचे पैसे मिळवणे एकदम सोप्पे झाले आहे. आता ईपीएफओ पोर्टलच्या मार्फत ऑनलाईन क्लेम केल्यावर पीएफचे पैसे मिळू शकतात. सध्या ऑनलाईन क्लेमची प्रक्रीया बदलली आहे. पीएफ खात्यातून अॅडवान्स पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला आता पासबुक किंवा चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी लागणार आहे. याअगोदर त्याची आवश्यकता नव्हती.

हेही वाचा – नोकरीची सुवर्णसंधी; मुंबई मेट्रोत १ हजार जागांची भरती

कसे मिळवाल PF चे पैसे?

  • पीएफचे पैसे मिळण्यासाठी सर्वात अगोदर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर आल्यानंतर युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड सोबत लॉगिन करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर होमपेजवर ऑनलाईन सर्विस कॅटेगिरी सिलेक्ट करायची.
  • त्यानंतर रजिस्टर बँक अकाउंटचे शेवटचे चार डिजीट टाकून वेरिफाय करावे लागेल.
  • वेरिफाय झाल्यानंतर ‘प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • यानंतर सेलेक्ट क्लेमचा एक पर्याय निवडून त्यामध्ये (FORM – 31, 19, 10C आणि 10D) या पर्यायावर क्लिक करावे.
  • या क्लेम ऑप्शनमध्ये पैशांची किंमत, घरचा पत्ता, पासबुक किंवा चेकचा स्कॅन केलेल्या फॉटोची कॉपी अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी वेरिफाय केल्यानंतर पीएफची किंमत मिळवण्याची क्लेम रिक्वेस्ट एक्टिव होईल.
  • त्यानंतर क्लेम स्टेटसवर क्लिक करुन काम कुठवर आले ते चेक करु शकतात.