Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग गर्लफ्रेंडबरोबर पती घेत होता डोश्याचा स्वाद अन् बायकोने दिला दणकून प्रसाद!

गर्लफ्रेंडबरोबर पती घेत होता डोश्याचा स्वाद अन् बायकोने दिला दणकून प्रसाद!

विवाह बाह्य संबंध असणाऱ्या पती-पतींचं बिंग कधी फुटले याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातून समोर आला आहे.

Related Story

- Advertisement -

पती-पत्नींमध्ये वाद-विवाद होण्यास कोणतंही एखादं शुल्लक कारण कारणीभूत ठरतं. यामध्ये विवाह बाह्य संबंध असणाऱ्या पती-पतींचं बिंग कधी फुटले याचा काही नेम नाही. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातून समोर आला आहे. एका व्यक्तीने त्याचे पहिले लग्न झाले असताना त्याने विवाह बाह्य संबंध जपले होते. दरम्यान, आपल्या पत्नीच्या नकळत त्याने त्याच्या गर्लफेंडसोबत डोसा खाण्याचा प्लान आखला. या ठरलेल्या प्लाननुसार दोघे एकमेकांना भेटले आणि डोश्याचा आस्वाद घेत होते. मात्र यानंतर असं काही घडलं जे वाचून तुम्ही देखील हैरान व्हाल…

असा घडला प्रकार

उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेत ठरल्याप्रमाणे दोघे भेटले. जेव्हा पती त्याच्या गर्लफेंडसोबत डोसा खात होता याचीच खबर त्याच्या लग्नाच्या पत्नीला लागली आणि सुरू असलेला प्रकार पाहून पत्नीचा राग अनावर झाला. ती थेट तिच्या पतीच्या गर्लफ्रेंडसमोर आणि डोसा खाण्याऱ्या पतीसमोर जाऊन धडकली आणि पतीचं पितळ उघडं पडलं.

- Advertisement -

हा प्रकार उत्तर प्रदेशच्या बांदा इथे घडला असून ही व्यक्ती जूनियर इंजिनिअर म्हणून काम करते. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका ठिकाणी तिला डोसा खाऊ घालण्यासाठी गेला होता. कोणाला याचा पत्ता लागू नये म्हणून कारमध्ये बसून त्यानं डोसा ऑर्डर केला. कारमध्येच गप्पा मारत त्यांचं डोसा खाणं सुरू होतं. मात्र यावेळी त्याला कोणीतरी पाहिलं आणि ओळखलं. त्याची माहिती पत्नीकडे पोहोचली आणि तिने तडक दोघांसमोर धडकली.

यावेळी पत्नी आणि पतीमध्ये कडाक्याचे भांडणदेखील झाले. यावेळी ती एकटी नव्हती तर तिने तिच्यासोबत घरातील काही माणसांना देखील नेले होते. दरम्यान, पत्नीला समोर बघून पतीची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी दोघात वाद झाला आणि दोघेही एकमेकांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी वाद वाढवू नका एकमेकांना समजून घेत वाद मिटवा, असे सांगितले आणि दोघांनाही समज देत घरी पाठवले.

- Advertisement -