Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग 'ब्रा'च्या साईजवरुन नवरा बायकोत राडा, पत्नीकडून घटस्फोटाची मागणी

‘ब्रा’च्या साईजवरुन नवरा बायकोत राडा, पत्नीकडून घटस्फोटाची मागणी

ऐकावं ते नवलंच...

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केला असताना बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्राधान्य दिले होते. यावेळी जास्तीत जास्त वेळ नवरा-बायको एकमेकांसोबत होते. असे असले तरी त्याच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊन दरम्यान लहान-सहान कारणांवरून अनेक जोडप्यात वाद झाले आणि या वादाचं रूपांतर थेट घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचले. असाच एक कहर करणारा प्रकार चीनमध्ये घडला. चीनमधील घटस्फोटाचा अजब किस्सा ऐकून नेमकं यावर कसं व्यक्त व्हावं, असा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. नवीन लग्न झालेल्या पतीने त्याच्या पत्नीसाठी तिच्या मापाचे अंतर्वस्त्र आणले नाही म्हणून पत्नीने टोकाचं भाडणं केले आणि थेट घटस्फोटाची मागणी केली. नव्या नवरीला तिच्या पतीने लहान साईजची ब्रा दिली. पतीकडून झालेल्या या लहानशा चुकीमुळे पत्नीला राग अनावर झाला अन् ती संतापली. तिने मोठा गोंधळ घातला. या शुल्लक कारणावरून पत्नीने घटस्फोटाचे टोक गाठले, या प्रकारामुळे सोशल मीडिय़ावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

असा घडला प्रकार

नव्या पतीने आपल्या पत्नीला ब्रा गिफ्ट दिली. मात्र त्याची साईज लहान निघाली. त्यामुळे पत्नीचा संताप अनावर झाला. तिला हा अपमान सहन झाला नाही. यावर व्यक्त होताना पत्नी म्हणाली, पतीला माझ्या ब्रा ची साईज माहित होती. पण तरी तो लहान ब्रा गिफ्ट म्हणून घेऊन आला. आताच त्याला माझ्याबद्दल, माझ्या आवडी-निवडींबद्दल काही माहित नाही तर भविष्यात कसा सांभाळ करणार…असा प्रश्न तिने उपस्थित केला. या सर्व गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे मुलीच्या घरच्यांनी तिची बाजू घेत तिला रागवण्याचा पूर्ण हक्क असल्याचे त्यांनी सांगितले. तर यासह ते असेही म्हणाले की, पतीकडून होणाऱ्या दुसऱ्या पार्टीत सहभागी होणार नाही, तर या सर्व प्रकारानंतर पतीने देखील आपली बाजू मांडली. यावेळी तो म्हणाला, त्याच्याकडून ब्राची साईज आणण्यात चूक झाली. त्याने ठरवून असे केले नाही. असेही स्पष्ट केले आहे.

- Advertisement -