भारतीय संघाला चिअरअप करणाऱ्या आजीबाई दिसणार ‘या’ जाहिरातीत!

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने बाजी मारली खरी, पण या लढतीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले ते 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी.

Mumbai

क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये बांग्लादेश विरूद्ध भारत अशा दोन संघात हा क्रिकेट सामना रंगला. मात्र या सामन्यात लक्ष वेधून घेणाऱ्या ८७ वर्षाच्या चारूलता पटेल या आजीबाईंनी सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

ICC World Cup 2019: आजीबाईंच्या ‘क्यूटनेस’वर नेटकरी फिदा!

बर्मिंगहॅम येथे झालेला सामना बघायला या आज्जीबाई व्हिलचेअरवरून सामना पाहायला आल्या होत्या. सामना संपल्यावर या आज्जीबाईंची कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्पेशल भेट घेतली होती. मात्र या आजीबाईंसाठी एक आनंदाची बातमी आहे. पेप्सिको कंपनीने त्यांच्या ‘स्वॅग’ मोहिमेत आज्जीबाईंना घेऊन एक जाहीरात बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

पेप्सिको कंपनीची ‘स्वॅग’ मोहिम

पेप्सिकोची प्रतिस्पर्धी कोका कोला हे आयसासीक्रिकेट विश्वचषकाचे ग्लोबल स्पॉन्सर्स आहेत. त्यांनी आयसीसीसोबत पुढील पाच वर्षांसाठी जवळपास ३०० कोटी रुपयांचा करार केला असून पेप्सिकोबरोबर बियॉन्स आणि प्रियांका चोप्रा सारखे सेलेब्रिटी आहेत. परंतु, आता चारुलता पटेल या आजींना पेप्सिको स्वॅग स्टार म्हणून समोर आणणार आहे. या ICC World Cup सामन्या दरम्यान ‘स्वॅग’ नावाची मोहिम सुरू होती. या मोहिमेची ‘हर घूंट में स्वॅग है’ अशी त्याची टॅगलाईन असून या टीम इंडियाच्या ‘जबरा फॅन’ असणाऱ्या आजीबाईंना घेतल्यास ही मोहिम अनेकांचे लक्ष वेधून घेईल.