घरट्रेंडिंगजान्हवीसाठी गाणं गायला आवडेल- लता मंगेशकर

जान्हवीसाठी गाणं गायला आवडेल- लता मंगेशकर

Subscribe

धडक सिनेमातील मुख्य नायिका जान्हवी कपूर सध्या भलतीच चर्चेत आहे. धडक सिनेमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या जान्हवीचं जगभरातून कौतुक होत आहे. अशातच एका दिग्गज व्यक्तिमत्वाशी नाव जोडलं गेल्यामुळे जान्हवी कपूर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गानसम्रज्ञानी लता मंगेशकर यांनी जान्हवी कपूरबाबत नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला जान्हवीसाठी गाणं गायला आवडेल’ असं वक्तव्य खुद्द लता मंगेशकर यांनी केलं असल्याने, सध्या सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरतो आहे. फारसे सिनेमे न पाहणाऱ्या लता दीदींनी नुकताच जान्हवीचा धडक सिनेमा पाहिला. सिनेमातील जान्हवीच्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

यासंबंधी अधिक बोलताना लता दीदी म्हणाल्या, ‘बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. अनिल कपूर आणि सुनिता यांच्या साखरपुड्यालाही मी हजर होते. त्यांची मुलगी सोनमचा विवाह झाला हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. सोनम खूप चांगला अभिनय करते. एक काळ असा होता जेव्हा एकदा लग्न झालं की मुली सिनेमात फार काम करत नसत. मात्र, तो काळ संपला आणि लग्नानंतर काम बंद करण योग्य देखील नाही.’

- Advertisement -

जान्हवीचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, ‘श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीचं अशाप्रकारे पदार्पण होणं, हे बोनी कपूरच्या आयुष्यात आनंद देणारं आहे. जान्हवी खूपच गोड मुलगी आहे. मला नक्कीच तिच्यासाठी गाणं गायला आवडेल.’ लता मंगेशकर यांनी केलेल्या कौतुकानंतर जान्हवी कपूरचा आनंद गगनात मावत नसणार हे नक्की. दरम्यान जान्हवी कपूरचा धडक सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली कमाल दाखवत आहे. आतापर्यंत सिनेमाने ३३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘धडक’ने ८.७१ कोटी रुपयांची कमाई केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -