घरटेक-वेकट्रेनमध्ये प्रवास करताना 'हे' नेटवर्क उत्तम

ट्रेनमध्ये प्रवास करताना ‘हे’ नेटवर्क उत्तम

Subscribe

सध्या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मोबाईलमध्ये नेटवर्क असणे. मोठमोठा दावा करणाऱ्या कंपन्यांची सत्यता तपासण्यासाठी ट्रायने एक सर्व्हे केला.

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात नेटवर्क पुरवण्याचा दावा करणाऱ्या मोबाईल नेटवर्क कंपन्या अनेकदा तोंडावर आपटल्या आहेत. कारण कानाकोपऱ्यात तर सोडा पण साध्या प्रवासातही अनेकदा नेटवर्कची दांडी गुल होते. त्यामुळे नेमकं कोणतं नेटवर्क वापरायचं ते कधीच कळत नाही. पण ट्रायने (TRAI) केलेल्या एक सर्वेक्षणात एक मोबाईल नेटवर्क कंपनी समाधानकारक कामगिरी करुन शकली आहे. त्यामुळे तुम्ही या कंपनीचे कार्ड वापरत नसाल आणि प्रवासात तुमच्या नेटवर्कची दांडी गुल होत असेल तर हे सीम वापरुन पाहाच

कोणती कंपनी देते हे उत्तम नेटवर्क?

सध्या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मोबाईलमध्ये नेटवर्क असणे. मोठमोठा दावा करणाऱ्या कंपन्यांची सत्यता तपासण्यासाठी ट्रायने एक सर्व्हे केला. त्यात सगळीकडे बोलबाला असणाऱ्या रिलायन्स जीओचे नेटवर्क चांगले असल्याचे ट्रायच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावेळी एअरटेल, वोडाफोन बीएसएनएल आणि जीओ कंपन्यांचे नेटवर्क तपासण्यात आले. यात सगळ्या मोठ्या आणि जुन्या कंपन्यांचे नेटवर्क रेल्वे आणि हायवे प्रवासादरम्यान चालले नाहीत. तर फक्त जीओ कंपनीचे नेटवर्क सुरु राहिले. कॉल ड्रॉप झाला नाही. असे अहवालात निदर्शनास आले.

- Advertisement -
वाचा- नेटवर्क नाही? मग करा ‘WIFI’ कॉल

कुठे घेतली टेस्ट ?

नेटवर्क तपासण्यासाठी ट्रायच्या टीमने देशभर प्रवास केला. रेल्वे आणि बायरोड असे दोन्ही प्रवास केले. हायवे प्रवास असनोल ते गया, दिघा ते असनोल, गया ते दानापूर, बंगळुरु ते मुरदेश्वर, रायपूर ते जगदालपूर, देहरादून ते नैनिताल, माऊंट अबू ते जयपूर आणि श्रीनगर, लेह लडाख असे बायरोड सर्वेक्षण करण्यात आले. तर ट्रेनने अहमदाबाद ते गोरखपूर, दिल्ली ते मुंबई आणि जबलपूर ते सिंग्रोली असा प्रवास करण्यात आला.

ट्राय (TRAI) म्हणजे काय? 

टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI.  टेलिकॉम नेटवर्कशी निगडीत सगळ्या  गोष्टी ट्रायकडून करण्यात येतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -