घरट्रेंडिंगमहिलेनं २० किलो अजगराला जिवंत पकडले; व्हिडिओ व्हायरल!

महिलेनं २० किलो अजगराला जिवंत पकडले; व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

एर्नाकुलममधील एका महिलेनं २० किलोच्या अजगराला पकडले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला.

एखाद्या माणसाला जर कधी साप आढळला तर त्याची पहिली प्रतिक्रिया ही भिती असते. मात्र सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एक महिला एका लांबलचक २० किलोच्या अजगराला पकडताना दिसत आहे. या महिलेच्या हावभावावरून त्या घाबरल्या आहेत असं अजिबात जाणवत नाही आहे. व्हिडिओच्या एका भागात ती चक्क अजगराला ‘बच्चा’ असं म्हणत आहे. हरिंदर सिक्कानं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या १ मिनीट ३६ सेकंदच्या व्हिडिओला आतापर्यंत २७ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

- Advertisement -

सिक्का यांनी टाकलेल्या व्हिडिओवर त्यांनी लिहीलय की ही महिला एका नौदल अधिकाऱ्याची बायको आहे. तर या महिलेचे नाव विद्या राजू असल्याचे एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट केलेलं आहे. या अजगराचं बचाव करण्यासाठी या महिलेसोबत ३ पुरुष दिसत आहेत ज्यातील एकाने नौदलाचा यूनिफॉर्म घातलेला आहे. त्यासह आणखी एक महिला देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर विद्या यांनी अजगराचं डोकं पकडलेले आहे आणि बाकी पुरुषांनी अजगराची शेपूट पकडलेली आहे.

विद्या या अगदी काळजीपूर्वकपणे अजगराला पकडत असून त्या अजगराला ‘बच्चा’ म्हणून बोलवत देखील आहे.

- Advertisement -

नेटकऱ्यांनी विद्या यांनी दाखवलेली हिम्मत फार आवडलेली आहे. याबद्दल नेटकऱ्यांनी विद्या यांचं फार कौतुक केलेलं आहे.


हेही वाचा: पाकिस्तानात ‘या’ तीन भारतीयांचा घेतला जातोय शोध!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -