सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०१९ च्या सामन्याचे चाहते फक्त तरुण मंडळी नाही तर आबालवृद्ध सुध्दा या विश्वचषक सामन्याचे चाहते आहे हे आजच्या बांग्लादेश विरुद्ध भारत या सामन्यादरम्यान बघायला मिळाले.
Me (99yrs) at 2089 World Cup. #INDVSBAN pic.twitter.com/uivELroT7Z
— The Black Magic Woman (@aanchalator) July 2, 2019
आज होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाला चिअरअप करायला तरुणाईचं नाही तर एक पांढरे केस असणाऱ्या एका आजीने देखील हजेरी लावली होती. या अजीबाईंनी केलेल्या धम्माल मस्तीमुळे सगळ्या उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींचेच नाही तर घरात बसून मॅच पाहणार्याचे देखील लक्ष वेधून घेतले.
या आजीने फक्त या सामन्यात हजेरीच लावली नाही तर सामन्याचा आनंद घेत भारतीय संघाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीवर तसेच चौकार षटकार मारल्यावर या आजीबाईंनी चक्क पापणी वाजवून एका लहानग्या मुलांप्रमाणे आनंद व्यक्त करताना दिसत होत्या.
The star of the match has got to be her ⭐️ #INDvsBAN pic.twitter.com/ADACqzpAES
— Tamanna Wahi (@tamannaW) July 2, 2019
हा त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून कॉमेंट्री करणाऱ्या सौरभ गांगुलीसह हर्षा भोगले या दोघांना देखील त्या क्युट आजीची दखल घ्यावीशी वाटली. फक्त हे दोघेच नाही तर क्रिकेटप्रेमींसोबत नेटकरी देखील या गोड आजीच्या क्युटनेसवर फिदा झाले आहे. सोशल मिडियावर देखील या आजीच्या फोटोंनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले.
आपल्या दोन्ही गालावर भारत देशाचा तिरंगा काढलेल्या आजी पिपाणी वाजवताना सामन्यादरम्यान टीव्हीवर दाखवल्यावर काहीच सेकंदात या आजीबाईंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले.