Wednesday, March 3, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग मोबाईल पेमेंटला भारतात सर्वाधिक पसंती; जगात तिसऱ्या स्थानी!

मोबाईल पेमेंटला भारतात सर्वाधिक पसंती; जगात तिसऱ्या स्थानी!

E-commerce Guide या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगात मोबाइल पेमेंटद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे आले समोर

Related Story

- Advertisement -

अर्थव्यवस्थेतील काळा पैसा, बोगस व्यवहारावर नियंत्रण रहावं म्हणून सरकारने डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन दिलं. ई-कॉमर्समधील हे व्यवहार सुरक्षित, सोयीस्कर, वेळेच्या दृष्टीने सुलभ असल्याने भारतात मोबाईल पेमेंटचा वापर सर्वाधिक होत असल्याचे समोर आले आहे. काही खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ई-कॉमर्समधील मोबाइल पेमेंटमध्ये भारत सध्या जगात तिसऱ्या स्थानी आहे. E-commerce Guide या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जगात मोबाइल पेमेंटद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये चीन सध्या आघाडीवर असून ८१ टक्के युजर्स मोबाईल पेमेंट करण्याला पसंती देतात. डेन्मार्कमध्ये ४०.९ टक्के तर भारतात ३७.६ टक्के युजर्स अनेक व्यवहार करताना मोबाईल पेमेंटचा वापर करतात.

रोख पैशांऐवजी डिजिटल पेमेंटचा वापर

आपण सगळेच बदलाला सामोरे जात असताना अगदी दैनंदिन आर्थिक व्यवहार करताना रोख पैशांऐवजी डिजिटल पेमेंटचा आपण सर्रास वापर करतो. मिळालेल्या माहितीनुसार, ‘स्टॅटिस्टा’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारतात २०१५ मध्ये मोबाइलद्वारे रिटेल ई-व्यापार ६ बिलियन डॉलरचा होता, तो २०१९ मध्ये ३० बिलियनचा, तर २०२० मध्ये अंदाजे ३८ बिलियन डॉलरचा आहे. जगभरात होणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी ई-व्यापारात जगात सर्वाधिक मोबाईल पेमेंटचा वापर केला जातो तर त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने व्यवहार होतात.

कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात वाढ

- Advertisement -

दरम्यान, वर्ल्डलाईन या संस्थेद्वारे देखील एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार भारतात सप्टेंबर २०२० मध्ये १८० कोटी ऑनलाइन व्यवहाराची नोंद करण्यात आली. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीची मागील वर्षातील त्याच तिमाहीशी तुलना केल्यास ८२ टक्के व्यवहारात, तर ९१ टक्के उलाढालीत वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये मोबाईद्वारे करण्यात आलेल्या पेमेंटचे प्रमाण सर्वाधिक होते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना कित्येक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमला परवानगी दिली. तर शाळेचा अभ्यासक्रम देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकवला गेल्याने ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली कोरोना काळात भारतात मोबाईल फोनचे युजर्सही वाढले. परिणामी स्मार्टफोन्सची विक्री अधिक झाल्याचे समोर आले.

- Advertisement -