घरट्रेंडिंग'गायीच्या दुधात सोनं असतं'; भाजपच्या नेत्याचा अजब दावा

‘गायीच्या दुधात सोनं असतं’; भाजपच्या नेत्याचा अजब दावा

Subscribe

या अजब दाव्यामुळे दिलीप घोष हे सध्या चर्चेत आले आहेत.

देशी गायींच्या दुधामध्ये सोनं असतं असा अजब दावा पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर घोष यांनी केलेल्या दाव्याबद्दल नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. बर्दवान जिल्ह्यातील एका कार्यक्रमात घोष असं म्हणाले की, ‘देशी गायीचे एक वैशिष्ट म्हणजे त्याच्या दुधात सोनं असतं. म्हणून गायीचे दुध पिवळसर दिसतं.’

तसंच ते पुढे म्हणाले की, ‘ज्या परदेशी प्रजातींच्या गायी आपण आणतो त्या आपल्या हिताच्या नसतात. त्यांचा आवाज देशी गायींप्रमाणे नसतो. त्या आपल्या गोमाता नसतात तर मावशा असतात. आपण या मावशांची पूजा केली तर ते देशाच्या हिताचं नाही. तसंच परदेशी गायीला सरळ पाठ असते म्हशीसारखी.’

- Advertisement -

या पिवळसर देशी गायीच्या दुधात प्रतिबंधक गुणधर्म आहेत. या दुधावर एक व्यक्ती जगू शकतो. हे दुध प्यायल्यावर काहीही खाण्याची गरज नाही. ते पूर्ण अन्न आहे. भारतासारख्या पवित्र भूमीवर गायींची हत्या करणं आणि गोमांस खाणं हा गुन्हाच आहे, असं घोष म्हणाले.

घोष यांनी केलेल्या अजब दाव्याबद्दल नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा.

- Advertisement -

हेही वाचा – #PanipatTrailer: ‘पानिपत’च्या महायुद्धाचा थरार रुपेरी पडद्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -