क्रिकेटपटू हे त्यांच्या मैदानावरील खेळासोबतच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठीही फेमस आहेत. एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन आणि हार्दिक पांड्या हे दोघेही वॉशरूमध्ये डान्स करताना दिसत आहेत.
नक्की काय आहे ‘हा’ व्हिडिओ
आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून सध्या भारतीय खेळाडू मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण टीम इंडियाची विमानातली मस्ती पाहिली. आयर्लंडच्या दौऱ्यासाठी जाताना भारतीय संघाने विमानात केलेल्या मजामस्तीचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हार्दीक पांड्या आणि युजवेंद्र चहल इतर प्लेअर्सची मजेशीर मुलाखत घेताना दिसून आले. आताही असाच एक मस्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात शिखर धवन आणि हार्दिक पांड्या हे दोघेही डान्स करत आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही फिफाच्या यावर्षीच्या ऑफिशिअल गाण्यावर डान्स करत आहेत. गायक निकी जॅम याने गायलेल्या ‘लिव्ह इट अप’ या गाण्यावर हे दोघेही डान्स करताना आपल्याला दिसत आहेत.
Me & jatta caught in action. We love dancing & singing. ? ? @SDhawan25 pic.twitter.com/P4vqsuxUVh
— hardik pandya (@hardikpandya7) July 1, 2018
आयर्लंडवरील विजयानंतर भारत इंग्लंडविरूद्ध सामन्यांसाठी सज्ज
भारताचा आयर्लंडवर रेकॉर्डब्रेक विजय झाला ज्यानंतर आता ३ जुलैपासून इंग्लंडविरूद्ध भारत सामने रंगणार असून या दौऱ्यात ३ जुलै, ६ जुलै आणि ८ जुलै ला टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. तर १२ जुलै, १४ जुलै आणि १७ जुलैला वन-डे खेळवण्यात येईल. तर १ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत कसोटी सामने खेळण्यात येतील.