घरट्रेंडिंगभारतीय कर्मचाऱ्यांने सिंगापूरच्या झेंड्याचा केला अवमान

भारतीय कर्मचाऱ्यांने सिंगापूरच्या झेंड्याचा केला अवमान

Subscribe

'फिर भी दिल है हिंदुस्थानी' म्हणत सिंगापूरच्या झेंड्याचा अवमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रध्वजाचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने त्याला आपली नोकरी देखील गमवावी लागली आहे.

सिंगापूरमधील एका भारतीय वंशाने ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ म्हणत सिंगापूरच्या झेंड्याचा अवमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तींने सोशल मीडियावर राष्ट्रध्वजाचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने या व्यक्तीला सिंगापूरमधील डीबीएस बँकेतील नोकरी देखील गमवावी लागली. भारताच्या स्वातंत्र्यदिनाला या व्यक्तींने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये सिंगापूरचा राष्ट्रध्वज फाटलेला दाखवत आतमध्ये तिरंगा असल्याचे या फोटोत दाखवण्यात आले होते.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अविजीत दास पटनाईक असे या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय वंशाचे आहेत. हे सध्या सिंगापूरमध्ये राहतात. अविजीत यांनी एका टी-शर्टवर सिंगापूरचा राष्ट्रध्वज फाटलेला असून त्याच्या आतमध्ये तिरंगा दाखवण्यात आला होता. हा फोटो अविजीत यांनी फेसबुकवरील सिंगापूर इंडियन्स अँण्ड एक्सपर्टस या ग्रुपवर फोटो शेअर करत ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ अशी कॅप्शन देखील दिली होती. या फेसबुक ग्रुपमध्ये अनेक सदस्य सहभागी होते. त्यामुळे हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या पोस्टनंतर अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करत हे अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर असून हा सिंगापूरचा अपमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नोकरी गमवावी लागली

गेल्या अनेक वर्षांपासून अविजीत दास पटनाईक हे सिंगापूरमध्ये राहत आहेत. ते सिंगापूरमधील डीबीएस बँकेत कार्यरत आहेत. मात्र त्यांनी जो फोटो शेअर केला ते आक्षेपार्ह असल्याने त्यांना बँकेने पत्रक जारी करत अविजीत हे आमचे कर्मचारी नसल्याचे जाहीर करत त्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे.

ह्रदयाने भारतीय आहे

गेले अनेक वर्ष जरी मी सिंगापूरमध्ये नागिरक म्हणून राहत असलो तरी मी वंशाने आणि ह्रदयाने भारतीय असल्याची प्रतिक्रिया अविजीत दास पटनाईक यांनी व्यक्त केली आहे. अविजीत यांच्या आपण जे केले ते आक्षेपार्ह असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तो फोटो फेसबुकवरुन काढून टाकला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -