या नवऱ्या मुलाचा डान्स बघून तुम्हाला हसू आवरणार नाही!

Mumbai

‘बाबा लगीन…ढिंच्याक ढिच्यांक’ हे वाक्य आपल्या कानावर आलं तर आपल्या डोळ्यांसमोर येतो पछाडलेला सिनेमातला उतावीळ नवरा. २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाथव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर अशी स्टारकास्ट असलेला पछाडलेला खूप गाजला होता. आपल्या आजूबाजूला असे अनेक उतावीळ नवरे आपण पाहत असतो. ‘बाबा लगीन…’ असं म्हणत अनेकजण लग्नाळू पोरांना चिडवतही असतात. अशाच एका लग्नाळूचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्न झाल्याच्या आनंदात हा नवरा मुलगा स्वतः गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत अफलातून डान्स करतो. हा डान्स बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. सदर व्हिडिओ उत्तर भारतातील लग्नातला असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर पछाडलेला सिनेमातलं ‘बाबा लगीन…ढिंच्याक ढिच्यांक’ आठवून पाहा…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here