महागाई निर्देशांकाचा नीचांक

Mumbai

गेल्या ८ महिन्यांपैकी डिसेंबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांकात (WPI) नीचांक गाठला आहे. जैवइंधनाच्या आणि काही अन्नाच्या किमती घसरल्याने डिसेंबरमध्ये या महागाईत घसरण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाई निर्देशांक ४.६४ टक्क्यांवरुन डिसेंबरमध्ये ३.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार अन्नधान्याची किमती या डिसेंबरमध्ये ०.०७ टक्क्यावर स्थिर राहिल्या आहेत. तर नोव्हेंबरमध्ये याच किमती ३.३१ टक्केे होत्या. नोव्हेंबरमधील भाज्यांच्या किमती २६.९८ टक्क्यावरून डिसेंबरमध्ये १७.५५ टक्क्यावर पोहोचल्या आहेत. नोव्हेंबरच्या तुलनेत ऊर्जा आणि जैवइंधन या वर्गवारीतील किमती घसरण होऊन त्या डिसेंबरमध्ये ८.३८ टक्के झाल्या आहेत.

पेट्रोलमध्ये १.५७ टक्के तर डिझेलच्या किमतीत ८.६१ टक्के डिसेंबरमध्ये घसरण झाली आहे. अन्नाच्या किमतीपैकी बटाटाच्या किमती या डिसेंबरमध्ये ४८.६८ टक्क्याने घसरल्या आहेत. डाळीचे भाव डिसेंबरमध्ये २.११ टक्के राहिले आहेत. तर अंडी, मटण आणि माशांच्या किमती ४.५५ टक्के राहिले आहेत. काद्यांच्या किमतीत डिसेंबरच्या तुलनेत ६३.८३ टक्के घसरण झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here