एंजेलिना जोलीसारखी दिसण्याकरिता ‘हिने’ केल्या ५० प्लास्टिक सर्जरी

सहार तबारा हिला नैतिका भ्रष्टाचार करण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Tehran
iranian instagram star arrested for posting spooky angelina jolie lookalike pics
'या' हॉलिवूड स्टार सारखी दिसण्याकरिता 'हिने' केल्या ५० प्लास्टिक सर्जरी

इराणच्या इन्स्टाग्राम स्टारने हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीसारखे फोटो शेअर केल्यामुळे आणि ईश्वराची निंदा केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. ताश्निग वृत्तसंस्थेतच्या माहितीनुसार, इराणची इन्स्टाग्राम स्टार सहार तबारा हिला नैतिक भ्रष्टाचारच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सहार तिचा चेहरा कॉस्मेटिक सर्जरीद्वारे बदलत होती आणि भीतीदायक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तसेच ती अनेक फोटो खूप एडिट करत होती. ज्यामुळे ती हॉलिवूड स्टार एंजेलिना जोलीसारखी दिसत होती. सहार हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे ते व्हायरल देखील झाले. यामुळे सहार हिला अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचाश्रद्धा कपूरने चक्क चाहत्याला केली किस!

निंदनीय कृत्य करणे, हिंसा करण्यास प्रवृत्त करणे, अयोग्य मार्गाने पैसे कमावणे, तरुणांना भ्रष्टाचार करण्यासाठी प्रवृत्त करणे यासह तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. हॉलिवूड स्टार एंजेलिना जॉलीसारखे दिसण्याकरिता सहार तबारने चक्क ५० प्लास्टिक सर्जरी केल्या. तसेच तिने डाइट करून ४० किलो वजन कमी केल्याचा दावा देखील केला जात होता. जेव्हा तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले तेव्हा सहार हिला प्रसिद्धी मिळाली.

विशेष म्हणजे इराणमध्ये फक्त इन्स्टाग्राम वापरण्यास परवानगी आहे. फेसबुक आणि टि्वटर सारख्या लोकप्रिय सोशल मीडियाला तिथे बंदी आहे.

हेही वाचाचहल क्विंटन डिकॉकला म्हणतो, ‘भाई आपसे ना हो पायेगा’!