सध्यातरी भारतात येण्याची चिन्ह नाही- इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इमरान खान याच्या कर्करोगावर भारताबाहेर उपाचार सुरु आहे. सध्या तरी भारतात येण्याची चिन्ह नसल्याचे त्याने सांगितले आहे.

Irrfan khan, cancer, surrender, neuroendocrine cancer, treatment, Bollywood actor irrfan, prayers, marathi news, marathi, Marathi news paper
irrfan khan
अभिनेता इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खानवर देशाबाहेर उपचार सुरु आहे. कर्करोगामुळे आजारी असल्याने त्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून neuroendocrine tumour या दुर्धर आजाराशी तो झुंज देतो आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रलाही कॅन्सर झाला होता. कॅन्सवर उपचार घेऊन सध्या सोनाली मुंबईत परत आली आहे. मात्र इरफान खान अजूनही उपचारासाठी देशाबाहेर आहे. सोनाली बेंद्र परतल्या नंतर आता इरफान खान कधी परतनार यावर त्याच्या फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र इरफान सध्या तरी भारतात परतनार नसल्याची चिन्हे आहे. उपचार बाकी असल्याने इरफान भारतात परतत नसल्याचे सांगितले जात आहे.

भारतात आला होता परत

लंडनमध्ये एका गंभीर आजारावर उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान अवघ्या दोन दिवसांकरता भारतात परतला होता. इरफानचा हा भारत दौरा खुपच गुप्त ठेवण्यात आला होता. इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा आजार जडला असून त्यावर उपचार घेण्यासाठी बॉलीवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहेत. दरम्यान, इरफान याने भारत दौरा केला असून त्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील शिव मंदिराला भेट दिली असून येथे हवन आणि पूजा केल्याचे समजते. ही माहिती स्पॉटबॉट या वेबसाइटने दिली असून इरफान एक वैयक्तीक कामासाठी भारतात परतल्याचे त्यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here