घरट्रेंडिंगलग्नानंतर ईशा अंबानी राहणार ४५२ कोटीच्या बंगल्यात

लग्नानंतर ईशा अंबानी राहणार ४५२ कोटीच्या बंगल्यात

Subscribe

वरळी सी - फेस अर्थात समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा बंगला ५० चौरस मीटर परिसरामध्ये बांधण्यात आलेला आहे. आनंद आणि ईशाला लग्नाची भेट म्हणून हा बंगला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे

अंबानी कुटुंबाची लाडकी ईशा १२ डिसेंबरला आनंद पिरामलशी विवाहबद्ध होत आहे. जोधपूरला अतिशय रॉयल पद्धतीने हा विवाह होणार आहे. मात्र लग्नानंतर ईशा जिथे राहणार आहे, त्याची किंमत तुम्हाला माहीत आहे का? लग्नानंतर आनंद आणि ईशा वरळी सी – फेसवरील बंगल्यात राहणार असून या बंगल्याची किंमत तब्बल ४५२ कोटी इतकी आहे. साधारण ६ वर्षांपूर्वी आनंद पिरामलचे वडील अजय पिरामल यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांच्याकडून बंगल्याची खरेदी केली होती.

कसा आहे हा बंगला?

वरळी सी – फेस अर्थात समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा बंगला ५० चौरस मीटर परिसरामध्ये बांधण्यात आलेला आहे. आनंद आणि ईशाला लग्नाची भेट म्हणून हा बंगला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या पाच बंगली मजल्याला बेसमेंटला ३ वेगवेगळे मजले आहेत. त्यामधील दुसरा मजला हा सर्व्हिससाठी तर तिसरा मजला हा पार्किंगसाठी आहे. या बंगल्यातील लेव्हल – १ बेसमेंटमध्ये एक लॉन, ओपन एअर वॉटर बॉडी आणि एक डबल हाईट मल्टिपर्पज रूम आहे. तर तळमजल्यावर प्रवेशद्वार असून वरच्या मजल्यावर राहण्याच्या रूम्स आहेत. शिवाय डायनिंग हॉल, ट्रिपल हाईट मल्टिपर्पज रूम, बेडरूम आणि स्टडी रूमही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये लाऊंजही आहे. याशिवाय ड्रेसिंग रूम आणि नोकरांसाठीही वेगळ्या रूम्स बनविण्यात आलेल्या आहेत. १९ सप्टेंबरला या बंगल्याच्या कागदपत्रांची सर्व देवाणघेवाणही पालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे.

- Advertisement -

अजय पिरामल यांनी घेतला होता बंगला

आनंद पिरामलचे वडील अजय पिरामल यांनी २०१२ मध्ये हा बंगला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडकडून ४५२.५ कोटींना विकत घेतला. त्यानंतर काही वाद बांधकामावरून निर्माण झाले होते. मात्र आता हे वाद मिटले असून २०१५ मध्ये पुन्हा एकदा बांधकाम सुरु झाले. हा बंगला बांधून पूर्ण झाला असला तरीही १ डिसेंबरपर्यंत याच्या फिनिशिंगचे काम सुरु राहणार आहे. दरम्यान १२ डिसेंबरपूर्वीच या घरामध्ये पूजा करण्यात येणार आहे अशी माहितीही समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -