‘या’ शहराची लोकसंख्या फक्त २, तरीही सोशल डिस्टन्सिंगचे करतात पालन

italy small town has only two residents but they always follow all covid-19 safety protocols
'या' शहराची लोकसंख्या फक्त २, तरीही सोशल डिस्टन्सिंगचे करतात पालन

कोरोनाच्या संकट काळात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोकं यादिवसात फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत आहेत. आता तर लोकं कोरोनासोबत जगायला शिकले आहेत. त्यामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मास्क घालून आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दैनंदिन जीवन जगत आहेत. दरम्यान इटलीमधील एक छोटेशे शहर हॅम्लेटची सध्या जास्त चर्चा होत आहे. या शहरात चक्क दोन लोकं राहतात. जियोवनी कॅरिली (८२) आणि जियाम्पियरो नोबिली (७४) नोर्टोस्के नावाचे दोन असे दोन व्यक्ती या शहरात राहतात. या शहरात दोनच लोक असून कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

सीएएनच्या वृत्तानुसार, या शहरात या व्यक्तीचे कोणतेही शेजारी नाही आहेत. तसेच या सेवानिवृत्त वृद्धांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची इच्छा नाही आहे. याच कारणामुळे हे दोघे कधीही हे शहर सोडून गेले नाही. हे शहर पेरुजा प्रांतातील उम्ब्रिया येथील आहे.

दोन लोकांची लोकसंख्या असलेल्या या इटलीच्या शहर पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे शहर सुमारे ९०० मीटर उंचीवर वसलेले असून तिथे जाणे आणि तिथून परत येणे फार अवघड आहे. कॅरिली आणि नोबिली स्वतःचा सुरक्षित ठेवण्यासाठी एकटे असल्यावर मास्क घालतात.

कॅरिलीने सीएनएनला सांगितले की, ‘विषाणूमुळे मृत्यूची भीती आहे. जर मी आजारी पडलो तर माझी काळजी कोण घेईल. मी वृद्ध आहे, परंतु मी मेंढ्या, बैल, मधमाशी आणि बाग सांभाळण्यासाठी येथे राहतो. मी माझे आयुष्य खूप चांगलं जगत आहे.’

सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचे आयुष्य धोक्यात आणणे या दोन्ही गोष्टी नोबेली मानत नाही. त्यांनी सीएनएनला सांगितले, ‘केवळ आरोग्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळू नका. यामध्ये काहीही चांगले किंवा वाईट नाही. जर हा नियम असेल तर आपण ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी पाळले पाहिजे.


हेही वाचा – जागतिक सर्वे म्हणतोय, भारतीयांना आवडतंय Work From Home; तुमचं काय म्हणणंय?