घरट्रेंडिंगकोरोना घालवण्यासाठी जपानी लोकांचा 'आईस बाथ'

कोरोना घालवण्यासाठी जपानी लोकांचा ‘आईस बाथ’

Subscribe

जपानमध्ये कोरोना घालवण्यासाठी अनोखी मोहीम

कोरोना घालवण्यासाठी अनेक लोकांना वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. आता जर तुम्हाला सर्दीच्या दिवसात बर्फाच्या पाण्यात अंघोळ करण्यास सांगितले आणि यामुळे कोरोना जाऊ शकता. तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? जपानी लोकांनी हे करून दाखवलं आहे. जपानची राजधानी टोकीयोमधील लोकांनी बर्फाच्या पाण्यात अंघोळ केली आहे. हे एक प्रकारे धार्मिक आयोजन होते, याचा हेतू कोरोनापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करणे होते.

माहितीनुसार, या बर्फाच्या पाण्यात अंघोळ करणाऱ्या लोकांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता. त्यांनी पहिल्यांदा पार्थना केली. यादरम्यान टोकियोमध्ये तापमान ५.१ डिग्री सेल्सियस होते. या धार्मिक योजनेत १२ लोकांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये तीन महिला होत्या.

- Advertisement -

या धार्मिक आयोजनेतील शिंजी ओओई म्हणाले की, ‘मी यावेळीस संपूर्ण जगातील लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. लवकरात लवकर ही कोरोना महामारीचा प्रकोप थांबावा आणि लोक पुन्हा आनंदी जीवन जगू देत.’

सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी लोक मास्कचा वापर करत आहेत. या कार्यक्रमात पहिल्यांदा लोकांनी वार्म-अप एक्सरसाईज केली, त्यानंतर ते बर्फाच्या पाण्यात गेले आणि त्यांनी प्रार्थना केली. एका व्यक्तीने सांगितले की, ‘यासाठी खूप लोक भाग घेतात, पण यावेळी १२ लोक उपस्थित होते. यामुळे पाणी खूपच थंड होते.’ दरम्यान जपानमध्ये २ लाख ८६ हजार ७५२ कोरोनाबाधितांची संख्या असून आतापर्यंत यापैकी ४ हजार ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख २२ हजार ९६३ रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –  Amzone बॉय करतोय चक्क घोड्यावरून वस्तूंची डिलिव्हरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -