घरट्रेंडिंगजेसीबीच्या खुदाईनंतर आता जेसीबीचा नागिन डान्स; व्हिडिओ व्हायरल

जेसीबीच्या खुदाईनंतर आता जेसीबीचा नागिन डान्स; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

जेसीबीच्या खुदाईनंतर आता जेसीबीचा नागिन डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर जेसीबीसोबत टाकलेल्या फोटोनंतर सोशल मीडियावर ‘जेसीबी की खुदाई’ नावाचा मोठा ट्रेंड चालला होता. या ट्रेंडच्या व्हिडिओंनी यूट्यूबवर देखील धुमाकूळ घातला होता. लाखो लोकांनी ते व्हिडिओ बघितले होते. याशिवाय कुणीही उठून जेसीबीसोबत फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर शेअर करायचे. या फोटोसोबत #JCBKiKhudai असा हॅशटॅग लावायचे. हा हॅशटॅग प्रचंड गाजला. या ट्रेंडनंतर आता जेसीबीशी निगडीत नवा ट्रेंडचा उगम झाला आहे. या ट्रेंडचे नाव ‘जेसीबीचा नागिन डान्स’ असा आहे.

काय आहे जेसीबीचा नागिन डान्स?

जेसीबीच्या खुदाईनंतर सोशल मीडियावर जेसीबीचा नागिन डान्स नावाचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. कुणीतरी टिकटॉकवर हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये जेसीबीला नागिन तर एका व्यक्तीला गारुडी दाखवले आहे आणि या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘मैं तेरी दुश्मन’ हे हिंदी गाणं वाजत आहे. या व्हिडिओ मनोरंजक आणि भन्नाट आहे.

- Advertisement -

जेसीबीचे खोदकाम पाहण्यासाठी लोक गोळा होतात

भारतात जेसेबीचे जेव्हा खोदकाम सुरु असते तेव्हा अनेक लोक ते खोदकाम पाहण्यासाठी रस्त्यावर उभे राहतात. लोक आपले कामे सोडून हे खोदकाम पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे सोशल मीडियावर जेसीबीच्या संदर्भात अनेक मीम्सचा पाऊस पडत आहे.


हेही वाचा – जेव्हा सनी लिओनीने पहिल्यांदा पाहिली होती पॉर्न फिल्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -