घरट्रेंडिंग'जेसीबी की खुदाई' ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ; प्रकरण नेमकं आहे तरी काय?

‘जेसीबी की खुदाई’ ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ; प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Subscribe

सोशल मीडियावर सध्या #JCBKiKhudayi या ट्रेंडने गोंधळ घातला आहे. या ट्रेंडमागील नेमकं कारण आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘जेसीबी की खुदाई’ हा ट्रेंड प्रंचड धुमाकूळ घालत आहे. #JCBKiKhudayi या ट्रेंडच्या मिम्सने सोशल मीडियावर अक्षरक्ष: गोंधळ घातला आहे. या मिम्समध्ये लोक जेसीबीचे खोदकाम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत. ही गर्दी ऐवढी की रेल्वेच्या छतावर, दरवाज्यावर लटकून जेसीबीचे खोदकाम पाहण्यासाठी लोक जात आहेत. या ट्रेंडचे व्हिडिओ व्हायरल देखील तितकेच होत आहेत. त्यामुळे ट्विटरवर #JCBKiKhudayi हा ट्रेंड टॉपमध्ये आला आहे. तरीदेखील काही लोकांना #JCBKiKhudayi हा ट्रेंड टॉपवर कसा आला? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे बऱ्याच युजर्सला ही भानगड काय ते अजूनही समजलेले नाही.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

या ट्रेंडचा जन्म होण्यामागे बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनीचा एक फोटो आहे. सनी लिओनीने एका जेसीबी सोबत फोटो सोशल मीडीयावर शेअर केला. त्या फोटोमधी सनी जेसीबीवर उभी असल्याची दिसत आहे. सनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील हा फोटो टाकला. या फोटोला तिने ‘Career change!? Lol’ असे कॅप्शन दिले. त्यानंतर हा फोटो इतका व्हायरल झाला की ट्विटरवर #JCBKiKhudayi हा ट्रेंड टॉपवर आला.

पाहा अजून काही मिम्स

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -