घरट्रेंडिंगभारतात 'या' क्षेत्रांत आहे नोकऱ्यांची संधी

भारतात ‘या’ क्षेत्रांत आहे नोकऱ्यांची संधी

Subscribe

कोरोनामुळे २०२० हे वर्षे जगभरासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. या आजाराने अनेकांचा बळी घेतला तर अनेकांवर आर्थिक संकट ओढावले. लॉकडाउनमुळे देश पुर्णपणे थांबला त्यामुळे अनेकांवर नोकरी गमवण्याची वेळ आली. त्यामुळे रोजगाऱ्या संधी देखील कमी झाल्या. परंतु नवे वर्षे रोजगारासाठी नव्या संधी निर्माण करत आहे. त्यामुळे नोकऱ्या गमावलेलया बऱ्याच नोकरदार वर्गाला पुन्हा एकदा संधी मिळणर आहे. यापरिस्थितीत जाणून घेऊ यावर्षी भारतात कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची संधी असेल.

 

- Advertisement -

डिजिटल मार्केटिंग

कोरोना काळात डिजिटल मार्केटिंगला अधिक महत्त्व निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्यामध्ये काही क्रिएटीव्ह करण्याची आवड असल्यास आणि ब्रॅड बिल्डिंगसह मार्केटिंगचे स्किल असल्यास आपण या क्षेत्रात प्रयत्न करु शकता. कोरोनामुळे अनेक व्यवसाय सध्या ऑनलाइन काम करण्यावर भर देत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डिजिटल मार्केटीग या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. डिजिटल मार्केटींगचे तंत्र शिकूण घेण्यासाठी आपण डिजिटल मार्केटींगचा कोर्स करु शकता किंवा एमबीए करणे देखील फायदेशीर आहे. यंदा भारतात आयटी क्षेत्रात अपेक्षा पेक्षा मोठी उलाढाल होत आहे .त्यामुळे आयटी कंपन्या डिजिटल मार्केटींग भर देत आहे. त्यामुळे येत्या काळात तरुणांना डिजिटल मार्केटींग क्षेत्रात करियरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे.

 

- Advertisement -

डेटा सायंटिस्ट

देशात अनेक कंपन्यांमध्ये आता डेटा सायंटिस्ट या पदासाठी विशेष मागणी होत आहे. कारण एका अहवालानुसार, अ‍ॅनॅलेटिक्स रेव्हेन्यूमध्ये 16 टक्के मागणी अ‍ॅडॅवान्स अ‍ॅनॅलेटिक्स, डेटा विज्ञान, प्रिडक्टीव्ह मॉडेलिंग म्हणजेच आकड्यांनूसार अंदाज इत्यादी क्षेत्रात आहे. कारण कंपनी ह्या डेटा सायंटिस्टचा वापर करुन विविध गोष्टीची माहिती गोळा करणे, तुलनात्मक माहितीचे संकलन करणे आदींवर भर देत आहे. हे काम डेटा सायंटिस्टच्या माध्यमातून होते. 2018 च्या तुलनेत हे 11 टक्के जास्त आहे. यावरून असे दिसून येते की आता भारतातही डेटा सायंटिस्टची मागणी वेगाने वाढत आहे. यासाठी आकडेवारी, गणितासोबत एसक्यूएल, पायथन आणि आर सारख्या तांत्रिक भाषेचे ज्ञान आणि पॉवर बीआय, Tableau टूल्समपगचीही माहीती असणे आवश्यक आहे. या माध्यामातून एक टीम सतत नव नव्या महितींवर, आकडेवारीवर नजर ठेवत असते. आणि यासाठी अनेक कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्ट पोस्टसाठी अनुभवी लोकांच्या शोधात आहे.

आर्टिफिशियर इंटेलिजेंस (AI)

भारतात अद्यापही आर्टिफिशियर इंटेलिजेंस या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांची संख्या कमी आहे. कारण हे क्षेत्र कंप्युटर प्रोग्रामिंग आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. एका आकडेवारीनुसार एआय पदासाठी जवळपास 2500 पदे रिक्त आहेत. ही संख्या येत्या काळात आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. यासाठी एआय अल्गोरिदम, प्रोग्रामिंग इत्यादी माहिती आवश्यक आहे. आर्टिफिशियर इंटेलिजेंस म्हणजे मनुष्याप्रमाणे काम करणारी मशीन किंवा रोबोट. परंतु ही पूर्ण मशीन तयार करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची गरज भासते. परंतु भारतात आता आर्टिफिशियर इंटेलिजेंस क्षेत्रात प्रगती होत आहे त्यामुळे येत्या काळात या क्षेत्रात अनुभवा लोकांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध होऊ शकते.

फुल स्टॅक डेव्हलपर्स

देशात आता अनेक, लहान मोठ्या कंपन्या सध्या ऑनलाईन व्यवसायावर भर देत आहे. त्यामुळे यासंबंधित वेब डेव्हलपिंग आणि मेटेंनन्सच्या क्षेत्राला देखील अधिक महत्त्व मिळत आहे. त्यामुळे वेब डेव्हलपिंग आणि इतर ऑनलाईन एडिटिंग संबंधित जॉबमध्ये वाढ होत आहे. आपल्याला कोडिंगमध्ये आवड असल्यास आणि जावा, सीएसएस, फोटोशॉप, कोरलड्रॉ इत्यादींचे ज्ञान असल्यास या क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -