घरटेक-वेककावासाकीने भारतात लाँच केली निंजा झेडएक्स-६आर

कावासाकीने भारतात लाँच केली निंजा झेडएक्स-६आर

Subscribe

ऐंशी, नव्वदीच्या दशकात कॉलेजमध्ये जाणार्‍या प्रत्येक तरुणाला कावासाकी निंजा या बाईकने वेड लावले होते. त्यावेळी आलेला टॉम क्रूसचा टॉप गन हा इंग्रजी चित्रपट गाजला होता. चित्रपटाच्या एका सीनमध्ये टॉम क्रूस विमानतळावर कावासाकी निंजावर बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यावरून फायटर विमान निघून जाते. त्या सीनमध्ये कावासाकी निंजा पहिल्यांदा दिसली आणि अनेक कॉलेज तरुण त्या बाईकच्या प्रेमात पडले. भविष्यात ही बाईक भारतात विक्रीसाठी येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण, कावासाकी निंजा भारतात चालवण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. कावासाकीने भारतात आपली नवी मिडलवेट सुपरस्पोर्ट बाईक 2020 कावासाकी निंजा झेडएक्स-6आर लाँच केली आहे.

ऑक्टोबर 2018 पासूनच कंपनीने या बाईकसाठी नोंदणी सुरू केली होती, त्यामुळे आधीपासूनच ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून डिलीव्हरी मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. नवी निंजा झेडएक्स-6आर अ‍ॅल्युमिनियम फ्रेमवर बनवण्यात आली आहे. बाईकमध्ये 17-लीटरची क्षमता असलेली पेट्रोल टाकी आहे. नव्या निंजामध्ये ट्विन एलईडी हेडलॅम्प्स आणि एलईडी टेल लाइट देण्यात आली आहे. या शानदार बाईकमध्ये एक अ‍ॅनालॉग टेकोमीटरसह डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. अपडेटेड ग्राफिक्समुळे ही बाईक आकर्षक दिसते. या सिंगल सीटर बाईकमध्ये साइड माऊंटेड एग्जॉस्ट आहे.

- Advertisement -

नव्या निंजा बाईकमध्ये 636cc, इन-लाईन 4-सिलिंडर, लिक्विड कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 13,500 rpm वर 130 bhp पावर आणि 11,500 rpm वर 70.5 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच देखील या बाईकमध्ये आहे. कावासाकीने नव्या निंजामध्ये भन्नाट लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स दिले आहेत. यामध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), दोन पावर मोड्स, एबीएस आणि कावासाकी क्विक शिफ्टर (KQS) असे दमदार फीचर्स आहेत. ही बाईक भारतातच असेंबल करण्यात आली असून केवळ एकाच रंगात उपलब्ध असणार आहे. ही बाईक १०.४९ लाख रुपयांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -