घरट्रेंडिंगसोशल मीडियावर होतय अनोख फोटोशूट व्हायरल

सोशल मीडियावर होतय अनोख फोटोशूट व्हायरल

Subscribe

लग्ना अगोदर किंवा लग्नानंतर फोटोशूट करण्याची क्रेज सध्या जास्त वाढली आहे. आठवणी लक्षात ठेवण्यासाठी काही जोडपे फोटोशूट करतात. सध्या केरळ मधील एका जोडप्यांच्या फोटोशूटबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या जोडप्याने लग्नानंतर चक्क चिखलात फोटोशूट केलं आहे. त्यामुळे हे आगळं वेगळं फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटोशूट बिनू सीन्स वेडिंग कंपनीने केलं आहे. फोटोग्राफरने असं सांगितलं की, हे जोडपं नेहमीच खास फोटोशूट करण्यासाठी सांगत असतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला.

या कंपनीचे मालक बिनू सीन्स हिंदुस्तान टाईम्सला बोलताना असं म्हणाले की, ‘मी वेगवेगळ्या शैलीचे फोटो कॅप्चर करतो, त्यामुळे मी ही थीम निवडली. बऱ्याच ग्राहकांची रोमँटिक फोटोशूट करण्याची मागणी असते. मात्र कधी वेडिंग फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये मड लव थीम वापरली गेली नव्हती. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच ही थीम करण्याचा प्रयत्न रेला आहे. केरळच्या सुंदर निर्सगात हे फोटो क्लिक केले आहेत.’

- Advertisement -

या जोडप्याचं नावं जोस आणि अनिशा असं आहे. या दोघांनी या थीमवर फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. यांचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिनू सीन्स या अकाऊंटवरून यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. जोस हा एक नेता असून अनिशा ही यूकेमध्ये नर्स आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंना २०० हून अधिक नेटकऱ्यांनी शेअर केले असून ८०० हून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे.

Mud Love ♥️Post wedding !Jose ♥️ Anisha Location ; Kerala ?+91 994648498Photography : binu seens…

binu seens photography ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ನವೆಂಬರ್ 18, 2019

- Advertisement -

या फोटोशूटबद्दल बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने असं लिहिलं, मला तुझा अभिमान आहे बिनू, उत्कृष्ट फोटोग्राफी केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, वेगळी थीम आणि उत्तम फोटो क्लिक. हे पाहू मज्जा येते.


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ४ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -