CoronaVirus: ‘LockDown’ मध्ये घराबाहेर पडताय; कपाळावर बसेल ‘हा’ शिक्का!

मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या शाईचा शिक्का,६० दिवस जाणार नाही शाई

Mumbai
LockDown'मध्ये घराबाहेर पडताय तर कपाळावर बसेल शिक्का!

सध्या जगभरात कोरोना या व्हायरसने अक्षरशः आपली दहशत निर्माण केली आहे. चीनमधून आलेल्या या जीवघेण्या व्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी सगळेच प्रशासनाला सहकार्य करत आहे. चीन नंतर इटलीमध्येही कोरोनाने घेतल्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारत देश देखील आता या संकटाच्या तीसऱ्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांचे तसेच कोरोना व्हायरस पसरलेल्या शहरांमधून गावाकडे येणाऱ्यांना होम क्वारंटाइनचा शिक्का हातावर दिला जातो. मात्र सध्या सोशल मीडियावर लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडलात तर कपाळावर मतदानावेळी वापरण्यात येणाऱ्या शाईचा शिक्का मारला जाईल असा मेसेज व्हायरल होत आहे.


हेही वाचा -CoronaEffect : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला गर्दी करणाऱ्यांना इशारा!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाउनच्या घोषणेमुळे लॉकडाउनदरम्यान लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली असून १४ एप्रिलपर्यंत हे लॉकडाउन असणार आहे. होम क्वारंटाइन केल्यानंतर घरातच त्या व्यक्तीला थांबवण्यास सांगितले जाते. होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेल्यांना १४ दिवस घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे हा शिक्का आपल्या आजू बाजूच्यांचा हातावर तर नाही न! असा विचार करत या शिक्क्याची देखील सामान्यांनी धास्ती घेतली आहे. मात्र या होम क्वारंटाइनच्या शिक्क्यासह आणखी एका शिक्क्याचा व्हायरल मेसेजची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

#stay@Homeउद्या पासून हा शिक्का कपाळावर मारला जाणार आहे, या मध्ये इलेक्शन(मतदान झाल्यावर जी बोटा) ला जी शाई वापरली…

Go-Corona ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮಾರ್ಚ್ 28, 2020

असा आहे व्हायरल मेसेज

उद्या पासून हा शिक्का कपाळावर मारला जाणार आहे, या मध्ये इलेक्शन(मतदान झाल्यावर जी बोटा) ला जी शाई वापरली जाते ती वापरणार आहे कमीत कमी 60 दिवस तो शिक्का कपाळा वरून जाणार नाही.. घरी बसा.. स्वतःची आणि कुटुंबाची काळीज घ्या विनाकारण घराबाहेर जाऊ नका शासकीय यंत्रनेला सपोर्ट करा.🙏

मात्र हा सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या फोटोचे नीट निरीक्षण केल्यास त्या शिक्क्यावरील अक्षरं ही सरळ दिसत असून सामान्य शिक्क्याच्या अक्षराची रचना उलटी असते. त्यामुळे हा फोटो एडिट केलेला असून असा शिक्काच नाही असे देखील सांगण्यात येत आहे. असा कोणता शिक्का असो वा नसो तरी नागरिकांनी सुरक्षित घरातच राहावे, असे आवाहन देखील सारखे प्रशासन आणि माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे.