घरट्रेंडिंगVideo: हजाराची पैज जिंकण्यासाठी माकडाला धरले वेठीस; चक्क माकडाची केली दाढी!

Video: हजाराची पैज जिंकण्यासाठी माकडाला धरले वेठीस; चक्क माकडाची केली दाढी!

Subscribe

हा मजेदार व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यादरम्यान केवळ जीवनावश्यक सेवांची दुकानं वगळता इतर दुकानं बंद ठेवण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. यावेळी सलूनची दुकानं बंद असल्याने न्हावीच्या हाताला देखील काम लॉकडाऊनमध्ये काम नाही. मात्र कोरोनाच्या या संकटात एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक न्हावी माकडाची दाढी करत असल्याचा हा मजेदार व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -

यासाठी न्हाव्याने केली माकडाची दाढी

सलून बंद असल्याने न्हाव्याला कोणतेही काम नाही. या परिस्थितीत एक माणूस न्हाव्याला चॅलेंज देतो, की जर त्याने माकडाची दाढी केली तर त्याला एक हजार रुपये देईल. या चॅलेंजसाठी न्हाव्याने माकडालाच वेठीस धरल्याचे दिसत आहे. तेव्हा न्हाव्यानं चक्क माकडाची दाढी केली. माकडही दाढी होईपर्यंत तोही गप्प बसला होते. ही मजेदार घटना बिहारमधल्या समस्तीपूर इथली ही घटना असल्याचे म्हटले जात आहे.

असा घडला प्रकार

एक माणूस न्हाव्याकडे आला आणि त्याने पाळीव माकडाची दाढी करण्यास सांगितले. त्या माणसाने माकडाची दाढी करण्याचे चॅलेंज न्हाव्याला दिले. माकडाची दाढी केल्यास हजार रुपये देईन असे तो म्हणाला. न्हाव्यानं यातून पैसे मिळतील म्हणून चॅलेंज देखील स्वीकारले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये माकडही आरामात दाढी करून घेत आहे. यावेळी माकड शांत बसल्याने लोकांनाही त्याचे आश्चर्य वाटत आहे.


Viral Photo: त्याने कुत्र्याचं पिल्लू समजून आणलं घरी, पण…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -