पाणीपुरीच्या खाण्याच्या नादात पाणीपुरीवाल्याच्या पडली प्रेमात आणि,…

lovers run away after girl fall in love with golgappa seller in mirzapur
पाणीपुरीच्या खाण्याच्या नादात पाणीपुरीवाल्याच्या पडली प्रेमात आणि,...

एक तरुण मुलगी पाणीपुरीच्या खाण्याच्या नादात ती पाणीपुरी वाल्याच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर ती तरुणी त्याच्यबरोबर घराबाहेर पळून देखील गेली. पण दुसऱ्या दिवशी ती घरी परत आली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले होते. ही घटना उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधील आहे.

मिर्झापूरच्या कछवा बाजारात ही घटना घडली. १७ वर्षाची तरुणी झांसी येथील रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणाऱ्याच्या प्रेमात पडली. ती दररोज पाणीपुरी खायला जात होती. यानंतर २८ जुलै रोजी रात्री ११ वाजता दोघे घरातून पळून गेले. मग तरुणीच्या कुटुंबियांना समजले की, रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणारा आणि मुलगी बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी कछवा पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळविले.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना तपास सुरू केला. दरम्यान पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या कुटुंबियांना मोबाईवरून फोन करून सांगितले की, ‘तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत झांसीला जात आहे.’ पण कुटुंबियांसह आणि पोलिसांशी बोलल्यानंतर विक्रेत्यांने त्या तरुणीला सोडले. दुसऱ्या दिवशी प्रियकरासह पळून गेलेल्या तरुणीला पोलिसांच्या मदतीने तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आले.

कछवा पोलिस स्टेशन प्रमुख सुभाषचंद्र राय यांनी सांगितले की, ‘ही घटना २७ के २९ जुलैची आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नव्हता. दुसऱ्या दिवशी ही तरुणी तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आली.’


हेही वाचा – …यामुळे मुंबईतील एका कंपनीने फेकले २६ टन आईस्क्रीम!